28 C
Mumbai
Saturday, July 27, 2024
Homeक्रिकेटमहिला प्रीमियर लीग २०२४ चा लिलाव कधी आणि कुठे?

महिला प्रीमियर लीग २०२४ चा लिलाव कधी आणि कुठे?

महिला कोणत्याच क्षेत्रात मागे नाहीत, हे अनेकदा सिद्ध झालं आहे. आतापर्यंत मेन्स आयपीएलची चर्चा असायची मात्र आता वुमन्स आयपीएलची चर्चा देशातच नाही तर जगभरात होत आहे. आयपीएलचा हंगाम जवळ येताच अनेक क्रिकेटप्रेमींना प्रतिक्षा लागते. गत वर्षी झालेल्या महिला आयपीएल स्पर्धेत मुंबई इंडियन्स संघाने बाजी मारली होती. या संघाचे नेतृत्व हरमनप्रीत कौरनं केलं होतं. आता लवकरच दुसरा हंगाम सुरू होणार आहे. यासाठी एकूण १६५ महिला क्रिकेटपटू खेळणार आहेत. यंदाच्या ‘वुमन आयपीएल’चा लिलाव हा (९ डिसेंबर) दिवशी होणार असल्याची माहिती समोर येत आहे. या वुमन आयपीएलमध्ये पाच संघ खेळणार आहेत.

वुमन आयपीएल’चं हे दुसरंच वर्ष आहे. या आयपीएलमध्ये एकूण पाच संघ लिलावासाठी असणार आहेत. त्याचप्रमाणे १६५ महिला खेळाडूंवर बोली लागणार आहे. यामध्ये १०४ महिला क्रिकेटर भारतीय आहेत. तर उर्वरीत ६१ परदेशी खेळाडू असून बोली लागणार आहे. वुमन आयपीएलध्ये पाच संघ असून त्यांची देखील चर्चा आहे. पहिल्या संघात पाच संघ सहभागी झाले होते आता होणाऱ्या सत्रात देखील पाच संघ सहभागी होणार आहेत.

हे ही वाचा

‘इतकं स्नेहसंबंध आहे तर पत्र का लिहावं लागलं?; ‘नावब’चा जवाब द्या’

‘मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठाण्यातील नगरसेवक’

समृ्द्धी महामार्गावर होणार ‘या’ सोयीसुविधा

पाच वुमन आयपीएल संघ

दिल्ली च वुमन आयपीएल संघकॅपिटल्स, यूपी वॉरिअर्स, रॉयल चॅलेंजर बॅंगलोर (महिला), गुजरात जायंट्स आणि मुंबई इँडियन्स संघाचा समावेश आहे. या पाच संघामध्ये बोली लावण्यासाठी केवळ ३० स्लॉट आहेत. यामध्ये १०४ भारतीय आणि ६१ परदेशी खेळाडू असे एकूण १६५ खेळाडूंवर बोली लावण्यात येत आहे. दरम्यान, वुमन आयपीएल’चा लिलाव कोठे आणि कसा पाहता येईल? याबाबत जाणून घेऊयात.

लिलाव कधी, कुठे आणि केव्हा पाहता येणार?

वुमन आयपीएलच्या २०२४ दुसऱ्या सत्रासाठी शनिवार, ९ डिसेंबर रोजी लिलाव होणार आहे. तर हा लिलाव मुंबईमध्ये होणार आहे. हा लिलाव दुपारनंतर अडीच वाजता पाहता येणार आहे. हा लिलाव जिओ सिनेमावर पाहता येणार आहे.  स्पोर्ट्वस १८ वर लाईव्ह पाहता येणार आहे.

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी