28 C
Mumbai
Saturday, July 27, 2024
Homeराजकीय'इतकं स्नेहसंबंध आहे तर पत्र का लिहावं लागलं?; 'नावब'चा जवाब द्या'

‘इतकं स्नेहसंबंध आहे तर पत्र का लिहावं लागलं?; ‘नावब’चा जवाब द्या’

राज्यात आगामी निवडणुकांचा वेध घेता राज्यातील राजकारण हे वेगळ्याच उंचीवर जाऊन पोहोचलं आहे. सत्तेसाठी पक्ष लाचारी पत्करत असल्याच्या चर्चा आहेत. नवाब मलिक हिवाळी अधिवेशनात आले आणि देवेंद्र फडणवीसांनी नवाब मलिक यांना सत्तेत घेऊ नये अन्यथा युतीत बाधा येईल, असे पत्रात नमूद केलं होतं. यानंतर नवाब मलिकांवर खोटा आरोप सत्ताधारी पक्षाने केला होता. आता तेच मलिकांना आपल्या सत्तेच्या राजकारणासाठी दूर लोटत असल्याच्या चर्चा आहेत. यामुळे अजित पवार गटात राडा सुरु आहे. यामुळे नवाब मलिकांच्या चर्चेवर मनसे आक्रमक झाली आहे. नवाब का जवाब दो म्हणत सत्तधारी पक्षावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

काय आहे नेमकं प्रकरण?

हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी नवाब मलिक आले असता, त्यांना विधानसभा अध्यक्षांनी अजित पवार गटाच्या बाकावर बसायला सांगितलं. यावेळी नवाब मलिक बसले. काही वेळानंतर विरोधी पक्षातील नेत्यांनी नवाब मलिकांवर देशद्रोही असा आरोप केला असून नवाब मलिकांचे दाऊदसोबत कनेक्शन असल्याची टीका केली. यानंतर फडणवीसांनी नवाब मलिकांना त्यांचे आरोप जोपर्यंत सिद्ध होत नाहीत तोवर त्यांना युतीत सहभागी होऊ देऊ नये, यामुळे युतीत बाधा येण्याची शक्यता आहे, असे पत्रात फडणवीसांनी नमूद केलं असून हे पत्र अजित पवारांना लिहिलं आहे. यावरून फडणवीस अजित पवारांना फोन करू शकत होते आणि सांगत होते, हे राज्याला जाहीर करण्याची गरज काय होती? यावरून काही पक्षांनी अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत.

हे ही वाचा

‘मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठाण्यातील नगरसेवक’

समृ्द्धी महामार्गावर होणार ‘या’ सोयीसुविधा

अॅनिमल चित्रपटाच्या वादाची राजकीय वर्तुळात चर्चा; खासदारांची मुलगी ढसाढसा रडू लागली

काही नेते म्हणाले की, हे सांगायचं होतं तर फडणवीसांनी अजित पवारांना फोन करून सांगायला हवं होतं. तर काही नेत्यांनी फडणवीसांनी लिहिलेलं पत्र हे अजित पवारांसाठी नाही तर राज्यातील जनतेसाठी लिहिलं आहे. यावरून आता भाजप आणि देवेंद्र फडणवीस चांगलेच तावडीत सापडले आहेत. याच प्रकरणावर पत्राचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यावर आता मनसेने आवाज उठवत नवाब का जवाब दो, असा आक्रमक पावित्रा घेतला आहे.

मनसे आक्रमक

मनसेनं आपल्या ‘मनसे अधिकृत’ या ट्विटर अकाऊंटवर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत एका बाजूला छगन भुजबळ, उपमुख्यमंत्री अजित पवार, देवेंद्र फडणवीस आणि प्रफुल्ल पटेल अगदी एकमेकांसोबत दिसत आहेत. यावेळी फडणवीसांनी पत्र अजित पवारांच्या हातामध्ये दिलं आहे. या फोटोवर मनसेनं इतका स्नेहसंबंध आहे तर पत्र का लिहावं लागलं? असा प्रश्न उपस्थित केला आहे.

‘इतका स्नेह संबंध आहे तर पत्र का लिहावं लागलं? सुहास्य वदन दाखवण्याची ही कोणती धडपड ? ‘नवाब’चा ‘जवाब’ द्या कि नका देऊ पण तुम्ही घातलेल्या राजकीय ढोंगीपणाच्या ‘नकाब’चा ‘जवाब’ मात्र तुम्हाला जनतेला द्यावाच लागेल नाहीतर जनता अगदी योग्य वेळी त्यांना गृहीत धरणाऱ्यांना धडा शिकवेल’; असा इशारा आता मनसेनं नवाब मलिक प्रकरणी फडणवीस आणि भाजपाला दिला आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी