22 C
Mumbai
Monday, December 9, 2024
Homeराजकीय'मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठाण्यातील नगरसेवक'

‘मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठाण्यातील नगरसेवक’

राज्यात आगामी निवडणुका लक्षात घेता विरोधक आणि सत्ताधारी पक्षांमध्ये कलगीतुरा पाहायला मिळत आहे. सर्वच फक्ष स्वत:चे घोडे दामटवत असल्याचा सध्या प्रकार सुरू आहे. टीका टीप्पणी आणि राजकारण या एका नाण्याच्या दोन बाजू आहेत. अशातच आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी (९ डिसेंबर) दिवशी मुंबईच्या समुद्रकिनारी सकाळी ट्रॅक्टर चालवत घाण साफ करत होते. यावरुन ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी एकनाथ शिंदेंवर जोरदार हल्ला करत चांगलं सुणावलं आहे. शिंदेंनी आधी आपल्या मंत्रीमंडळातील साफ सफाई करायला हवी. त्यांनी भ्रष्टाचाराची साफ सफाई करायला हवी, असे राऊत म्हणाले आहेत.

मुंबईच्या समुद्रावर ट्रॅक्टर चालवताना एकनाथ शिंदेंनी साफ सफाई केली आहे. यावर संजय राऊतांनी एकनाथ शिंदेंना डिवचलं आहे. बिचवर जात सफाई करणं हे तुमचं काम आहे का? अशा सवाल या ठिकाणी उपस्थित केला आहे. हे महापालिकेचं काम आहे. नगरसेवकांचे काम आहे. ठाणे, पुणे, नगर, नाशिक  १४ महानगरपालिका निवडणुका घ्या मुख्यमंत्र्यांना अशा प्रकारचे सोंग करायची गरज पडणार नाही. शिंदेंची भूमिका ही ठाण्यातील नगरसेवकांसारखी आहे, अशी टीका संजय राऊतांनी केली आहे. त्यांनी एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांचे नाव न घेता त्यांचा घाशीराम कोतवाल असा उल्लेख केला आहे.

हे ही वाचा

समृ्द्धी महामार्गावर होणार ‘या’ सोयीसुविधा

अॅनिमल चित्रपटाच्या वादाची राजकीय वर्तुळात चर्चा; खासदारांची मुलगी ढसाढसा रडू लागली

महुआ मोईत्रांची खासदारकी रद्द

‘महाराष्ट्रात घाशीराम कोतवालांचं राज्य’

महाराष्ट्रात घाशीराम कोतवालांचं राज्य आहे. तीन घाशीराम कोतवाल राज्यात राज्य करत आहेत. असे म्हणत त्यांनी पेशवाईकाळात घाशीराम कोतवालांचा कार्यकाळ बघा..कशी लुटमार केली होती. कशी दरोडेखोरी केली होती, असे म्हणत राऊतांनी एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांचे वाभाडे काढले आहेत. यानंतर त्यांनी ललित पाटील प्रकरणावर भाष्य केलं आहे.

ससून ड्रिग्ज प्रकरणात धरपकड चालू आहे. एक प्रकारे लग्नाचा खेळ सुरू आहे. कॅबिनेटमधील थेट मंत्र्यांचा यात समावेश होतो. ललित पाटीलला वर्षभर ससूनमध्ये ठेवण्यात आलं आहे. त्याला प्रोटक्शन देण्याचं काम या दोघांचं असल्याचं राऊत म्हणाले आहेत.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी