31 C
Mumbai
Saturday, February 4, 2023
घरक्राईमब्रँडेड कंपनीची बनावट पायताणे; पोलिसांची दुकानदारांवर कारवाई

ब्रँडेड कंपनीची बनावट पायताणे; पोलिसांची दुकानदारांवर कारवाई

आंतरराष्ट्रीय कंपनीच्या ब्रॅण्डच्या (Branded shoes company) नावाखाली बनावट पायताणे (Duplicate product) विकून ग्राहकांना गंडा घालणाऱ्या दुकानदारांना (shopkeepers) त्यांच्या साथीदारासह गुरुवारी पोलिसांनी अटक केली. याप्रकरणी खार पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला असून पाच दुकानदारांसह सहा आरोपींना अटक करण्यात आली आहे. एका आरोपीचा पोलिस शोध घेत आहेत. आरएनए कंपनीच्या प्रतिनिधींनी काही दुकानदार “प्युमा” कंपनीच्या बनावट पायताणांची विक्री करीत असल्याची तक्रार अंमलबजावणी कक्षाच्या गुन्हे शाखेकडे केली होती. त्यानुसार पोलिसांनी खार येथील क्रोमा लिंक स्क्वेअर मॉल आणि वांद्रे येथील लिंकिंग रोडवरील दुकानांवर छापा टाकला. या दुकानांमधून तब्बल ७ लाख ९९ हजार रुपये किमतीची “प्युमा” कंपनीच्या बनावट चपला आणि बूट हस्तगत करण्यात आली. (Branded shoes company Duplicate product Police action against shopkeepers)

खार येथील क्रोमा लिंक स्क्वेअर मॉल आणि वांद्रे येथील लिंकिंग रोडवरील काही दुकानदार आंतरराष्ट्रीय कंपनीच्या ब्रॅण्डची बनावट पायताणांची विक्री करून ग्राहकांची फसवणूक करीत असल्याची तक्रार आरएनए कंपनीच्या प्रतिनिधींनी गुन्हे शाखेकडे केली होती. त्यानंतर पोलिसांनी  लिंक स्क्वेअर मॉलमधील पहिल्या मजल्यावरील दुकान क्रमांक २९ आणि ३१ तसेच वांद्रे लिंक रोडवरील ४ पायताणांच्या स्टॉल्सवर छापेमारी केली.

हे सुद्धा वाचा

योगी आदित्यनाथ शिवरायांच्या मूर्तीपुढे झाले नतमस्तक!

दुरदर्शन, आकाशवाणीला येणार अच्छे दिन!

रिषभ पंतच्या नावाने गिरगाव चौपाटीवर फलक

या कारवाईदरम्यान आरएनए कंपनीचे प्रतिनिधींनीदेखील उपस्थतीत होते. या कारवाईत तब्बल ७ लाख ९९ हजार रुपये किमतीची “प्युमा” कंपनीची बनावट पायताणे पोलिसांनी हस्तगत केली. कॉपीराईट कायदा कलाम ५१ आणि ६३ अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला असून आरोपींना खार पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. तर एका आरोपीचा पोलीस शोध घेत आहेत. सहाय्यक पोलीस निरीक्षक कानवडे आणि त्यांच्या पथकाने ही कारवाई केली. पुढील तपास खार पोलीस करीत असल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक कानवडे यांनी दिली. इतरही आंतरराष्ट्रीय नामांकित ब्रॅण्डच्या पादत्राणांची बेकायदेशीर विक्री सुरु आहे का याबाबतही पोलीस कसून तपास करीत आहेत.

संबंधित

सर्वात लोकप्रिय

व्हिडीओ गॅलरी

error: Content is protected !!