31 C
Mumbai
Friday, September 1, 2023
घरक्राईमठाकरे गटाचा नेता बैठकीला जातो असे सांगून गेला; रेल्वे रुळावर आढळा छिनविछिन्न...

ठाकरे गटाचा नेता बैठकीला जातो असे सांगून गेला; रेल्वे रुळावर आढळा छिनविछिन्न मृतदेह

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे नेते सुधीर मोरे यांचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. त्यांच्या मृत्यूच्या घटनेने मोठी खळबळ उडाली आहे. एका खासगी बैठकीला जात असल्याचे त्यांनी आपल्या खासगी सुरक्षा रक्षकाला कळविले होते. मात्र घाटकोपर येथे रेल्वे रुळावर त्यांचा मृतदेह आढळून आला असून त्यांनी आत्महत्या केली की हत्या झाली याबाबत उलटसुलट चर्चा सुरु आहेत.

सुधीर मोरे हे शिवसेना ठाकरे गटाचे एकनिष्ठ शिवसैनिक म्हणून ओळखले जात होते. शिवसेनेत फुट पडल्यानंतर त्यांनी ठाकरेंसोबतच राहण्याचा निर्णय घेतला होता. विक्रोळी पार्कसाईड भागातून त्यांनी आपली राजकीय कारकिर्द सुरु केली होती. मुंबई महापालिकेचे ते नगरसेवक देखील होते. सध्या ठाकरे गटाचे रत्नागिरी जिल्ह्याचे संपर्कप्रमुख म्हणून त्यांच्याकडे जबाबदारी होती.

ते आपल्या खासगी सुरक्षा रक्षकाला आपण खासगी बैठकीला जात आहोत असे सांगून गेले. मात्र गुरुवारी ( दि 31) रोजी रात्री घाटकोपर रेल्वे स्थानकाच्या परिसरात रेल्वे रुळावर त्यांचा छनविछिन्न अवस्थेतील मृतदेह आढळून आला. या घटनेची माहित रेल्वे पोलिस आणि मोरे यांच्या समर्थकांना समजताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली.

हे सुद्धा वाचा 
पोलिसांनीच केली चोरी!
शाहरुखला हवीय आलिया भट…आलियाची आतुरता वाढली…
नयनताराने चाहत्यांसाठी आणली आहे गोड बातमी…

मोरेंना कोणी ब्लॅकमेल करत होते ?
सुधीर मोरे यांना गेल्या काही महिन्यांपासून ब्लॅकमेल करत असल्याची माहिती देखील आता समोर येत आहे. याच प्रकरणातून त्यांनी आत्महत्या केली असण्याचा संशय व्यक्त केला जात आहे. ब्लॅकमेलिंगचे कॉल रेकॉर्ड करण्यासाठी त्यांनी एक नवीन फोन देखील घेतला होता अशी माहिती आता समोर येत आहे. दरम्यान या फोनची तपासणी व्हावी अशी मागणी मोरे यांच्या जवळच्या व्यक्तींकडून केली जात आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी