33 C
Mumbai
Monday, May 20, 2024
Homeमहाराष्ट्रधैर्यशील मोहिते पाटलांनी भाजपकडे फिरवलेली पाठ नेमका काय संकेत देते...

धैर्यशील मोहिते पाटलांनी भाजपकडे फिरवलेली पाठ नेमका काय संकेत देते…

भाजप ने मोहिते पाटलांसोबत काय खेळी खेळली हि सगळ्यांच्याच लक्षात आल ... केवळ इतर पक्षांना फोडून आपलं पक्षबळ वाढवणं एवढाच काय तो भाजपचा उद्देश असेल, हेच यातुन दिसून येतं.

मोहिते पाटलांनी भाजपाकडे फिरवलेली पाठ नेमकं काय संकेत देतेय.(Dhairyasheel Mohite Patil is with Sharad Pawar again) .आपलं राजकीय अस्त्तित्व टिकवण्याच्या हेतूने भाजप मध्ये गेलेले बरेच इतर पक्षातील उमेद्वार पुन्हा हाती काही न लागल्याने माघारी फिरताहेत कि काय असं चित्र सध्या दिसत आहें. २०१४ साली मोदींची जी लाट आली ती बऱ्याच जणांना आपल्या सोबत घेऊनही गेली. राजकीय प्रतिष्ठा असेल वा चौकशीपासून स्वतःचा बचाव असेल अशा काही कारणांमुळे अनेक दिग्गज नेते त्यांचा पक्ष सोडून भाजप मध्ये सामील झाले. शिंदेनी केलेला बंडखोरपणा तर सर्वानीच पाहिला . त्यानंतर उदयनराजे भोसले, महाडिक असतील विखे पाटील या पाठोपाठ अजित पवारांनी भाजपमध्ये केलेला पक्षप्रवेश हा अनपेक्षितच होता. पण हे सगळं झालं कशासाठी तर राजकीय स्थैर्य हवं होतं म्हणूनच ना. तर ते मिळालं का. कालचच उदाहरण घेतलं तर भाजप ने मोहिते पाटलांसोबत काय खेळी खेळली हि सगळ्यांच्याच लक्षात आल . केवळ इतर पक्षांना फोडून आपलं पक्षबळ वाढवणं एवढाच काय तो भाजपचा उद्देश असेल, हेच यातुन दिसून येतं. याची उपरती मोहिते पाटलांना झाली तशी इतरांना देखील होते कि काय हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे. भाजपसोबत सध्या राष्ट्रवादी अजितपवार गट, शिवसेना शिंदे गट हे असताना उम्मेदवारी नेमकी कोणाला जाहीर होणार या कडे सर्वांचेच लक्ष होत . याच साठी केला होता अट्टहास. …. तर ज्यासाठी एवढा खटाटोप करत पक्षांतराचा खेळ खेळाला गेला त्यातून कोणाला काय साध्य झालं हे आपण सगळेच पाहतो आहोत. उमेदवारांची यादी जाहीर झाल्यानंतर भाजपने इतरांना केवळ सत्तेचं गाजर दाखवुन पळवलं कि काय असच दिसत आहे . यामुळे हाती निराशा आल्याने अनेकांची स्वगृही जाण्याची वाटचाल सुरु झालेली दिसतेय. शिंदे गटाचे ८ उमेदवार , अजित पवार गटाचे ४ , राणा दाम्पत्य १ अशी अगदी शुल्लक उमेदवारी जाहीर करत केवळ भाजपच्या इतर उमेदवारांचा प्रचार करण्याचाच काम या पक्षांना करावं लागणार आहे बहुतेक, असच चित्र दिसतंय . काही जण तर इथे स्वतःचा स्वार्थ न बघता बिनशर्त पाठिंबाही देताना दिसताहेत, भाजपासाठी हे हि नसे थोडके……

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी