31 C
Mumbai
Friday, May 3, 2024
Homeमुंबई'दलित पँथर' ग्रंथाचा प्रकाशन सोहळा संपन्न

‘दलित पँथर’ ग्रंथाचा प्रकाशन सोहळा संपन्न

टीम लय भारी

मुंबई : ‘दलित पॅंथर’ या ग्रंथाचा प्रकाशन सोहळा दादर येथील आंबेडकर भवन येथे काल उत्साहात (दि.08 जुलै) पार पडला. ज. वि. पवार लिखित दलित पँथर ग्रंथाचे हे प्रकाशन डाॅ. बाबासाहेब यांचे नातू भीमराव आंबेडकर यांच्या हस्ते पार पडले. याप्रसंगी पँथरच्या सिद्धार्थ नगरच्या छावणीचे (बापटी रोड) तत्कालीन प्रमुख शिवराम आरगांवकर हे कार्यक्रमाचे अध्यक्षपदी विराजमान होते.

यावेळी मार्गदर्शन करताना भीमराव आंबेडकर म्हणाले, दलितांवरील अन्याय अत्याचाराचा मुकाबला करणारा, दलित तरुणांना ऊर्जा देणारा पँथरचा लढा आजच्या पिढीला माहिती असणे आवश्यक आहे, असे म्हणत पॅंथर लढ्याचे महत्त्व ठळकपणे अधोरेखित केले.

दरम्यान, ग्रंथाचे लेखक ज.वि.पवार म्हणाले, काही लोक दलित पँथरचा स्थापना दिन म्हणून 9 जुलै हा दिवस साजरा करीत आहेत. 9 जुलै हा स्थापना दिन नसून तो पहिला मेळावा दिन आहे. स्थापना 29 मे 1972 या दिवशी झाली असून जी मंडळी 9 जुलै साजरी करीत आहेत त्यापैकी एकही कार्यकर्ता 9 जुलै 1972 च्या मेळाव्यात हजर नव्हता. या ग्रंथात मेळाव्याचे अध्यक्ष आ.शं.कसबे यांनी स्वहस्ताक्षरात तशी नोंद केली आहे की 9 जुलै हा स्थापना दिन नसून पहिला मेळावा दिन आहे, असे सांगून लोकांच्या गैरसमजूतीवर त्यांनी यावेळी टिप्पणी केली.

या प्रकाशन सोहळ्यास मेध जाधव,सचिन अहिरे,गौतम जाधव,डॉ.श्रीधर पवार यांच्यासह अनेक वितरक सुद्धा उपस्थित होते.

 हे सुद्धा वाचा…

एकनाथ शिंदेंनी बायको, सुन, नातवंडाला मंत्रालयात नेले, अन् काम सुरू केले !

भाजप – शिवसेना युती सरकारचा मोठा निर्णय; गृहनिर्माण सोसायट्यांचा भुर्दंड झाला माफ

शहाजी बापू पाटील यांना प्राध्यापक नरकेंनी खडे बोल सुनावले

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी