29 C
Mumbai
Wednesday, May 1, 2024
Homeमुंबईभाजपच्या लाडक्या बंडखोर आमदाराने हिंदुत्ववादी फडणवीसांना बनवले ख्रिश्चन

भाजपच्या लाडक्या बंडखोर आमदाराने हिंदुत्ववादी फडणवीसांना बनवले ख्रिश्चन

टीम लय भारी

मुंबई : महाविकास आघाडी सरकार कोसळल्यानंतर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री पदी आणि देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री पदी बसले आहेत. पण देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या त्यागामुळे त्यांच्या समर्थकांकडून अनेक ठिकाणी ‘देवमाणूस’ तसेच इतर पोस्टर लावण्यात आले आहे. पण मीरा रोड येथे लावण्यात आलेल्या एका पोस्टरमध्ये देवेंद्र फडणवीस यांचे नाव बदलून चक्क देवेंद्र ‘फर्नांडिस’ असे लिहिण्यात आले आहे. एका बंडखोर आमदाराच्या कार्यकर्त्याच्या या प्रतापामुळे सगळीकडे हा चर्चेचा विषय ठरला.

सेनेशी बंडखोरी केलेले आमदार प्रताप सरनाईक यांच्या एका कार्यकर्त्याने हा प्रताप केल्याचे उघड झाले आहे. मीरा रोड येथील स्वीकृत नगरसेवक विक्रम प्रतापसिंह यांनी शांती नगर या विभागातील जैन मंदिर परिसरात हे बॅनर्स लावले होते. हिंदी भाषेत लावण्यात आलेल्या या बॅनरमध्ये एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस या दोघांनाही शुभेच्छा देण्यात आलेल्या आहेत. या बॅनरमध्ये एकनाथ शिंदे यांचे नाव बरोबर असले तरी हिंदुत्ववादी देवेंद्र फडणवीस यांच्या नावात घोळ घालण्यात आला.

भाजपच्या लाडक्या बंडखोर आमदाराने हिंदुत्ववादी फडणवीसांना बनवले ख्रिश्चन

या बॅनरचा फोटो सोशल मीडियावर आल्यानंतर लोकांनी मोठ्या प्रमाणात हा फोटो शेअर केला. त्याचबरोबर या फोटोला उद्देशून मिम्स तयार करून ते व्हायरल करण्यात आले. दोन दिवसांपूर्वी देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या राजकीय भूकंपाच्या वेळी घडणाऱ्या भेटींबाबतचे गुपित सांगितले. देवेंद्र फडणवीस हे वेशांतर करून एकनाथ शिंदे यांना भेटायला जायचे असे मिसेस फडणवीस यांनी सांगितले. त्यामुळे तेव्हाच देवेंद्र फडणवीस यांनी आपले आडनाव बदलून फर्नांडिस असे ठेवले होते का ? असे गंमतीशीर प्रश्न लोकांकडून विचारण्यात येत आहे.

हे सुद्धा वाचा :

जितेंद्र आव्हाड आभार मानण्यासाठी पोहचले मंत्रालयात

सरकारने ‘स्थगिती सरकार’ अशी प्रतिमा बनवू नये -अशोक चव्हाण

नितीन गडकरी यांना ‘डॉक्टर ऑफ सायन्स’ पदवी देऊन सन्मान

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी