38 C
Mumbai
Sunday, April 28, 2024
Homeटॉप न्यूजशिवसेनेचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री सुधीर जोशी यांचे निधन

शिवसेनेचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री सुधीर जोशी यांचे निधन

टीम लय भारी

मुंबई : शिवसेनेचे ज्येष्ठ नेते सुधीर जोशी यांचं आज मुंबईमध्ये निधन झाले आहे. ते ८१ वर्षाचे होते. ते शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विश्वासू सहकारी होते. मागील काही दिवसांपासून त्यांची प्रकृती चिंताजनक होती. त्यातच मुंबईच्या जसलोक रुग्णालयात आज त्यांचे निधन झाले(Senior Shiv Sena leader Sudhir Joshi passes away).

‘संस्कृत व सुशिक्षित कार्यकर्त्यांचे मोहोळ लाभलेला’ आणि लोभस व्यक्तिमत्त्व असलेला, एकमेव शिवसेना नेता म्हणजे सुधीरभाऊ जोशी होय. मुंबईचे माजी महापौर तरुण व तडफदार सुधीर जोशी यांच्याकडे सुशिक्षित कार्यकर्त्यांची फौज असलेल्या स्थानीय लोकाधिकार समितीची धुरा मा. बाळासाहेबांनी सोपविली, ती त्यांनी समर्थपणे सांभाळली आणि बाळासाहेबांनी त्यांच्यावरील टाकलेला विश्वास त्यांनी सार्थ ठरविला. बाळासाहेबांच्या सहकारी नेत्यांतील एक विश्वासू सहकारी नेता म्हणून ते बाळासाहेबांचे जवळचे सहकारी राहिले आहेत.

सुधीर जोशी हे मनोहर जोशी यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री राहिले होते. महसूल आणि शालेय शिक्षण असे सोन विभागाचे नेतृत्व त्यांनी केले होते. तसेच, ते शिवसेनेचे दुसरे महापौर होते. १९९९ मध्ये त्यांनी राजकीय संन्यास घेतला होता.

हे सुद्धा वाचा 

महापौरांची मोठी घोषणा; आता ‘यांना’ मास्कची सक्ती नाही

मिठी नदीकडे मुख्यमंत्री आणि मुख्य सचिवांनी फिरवली पाठ

Mumbai: Shiv Sena leader, former minister Sudhir Joshi no more

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी