30 C
Mumbai
Tuesday, May 7, 2024
Homeमनोरंजनडॉ. अमोल कोल्हे पुन्हा एकदा झळकणार छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत

डॉ. अमोल कोल्हे पुन्हा एकदा झळकणार छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत

टीम लय भारी

मुंबई : डॉ. अमोल कोल्हे ‘स्वराज्य सौदामिनी ताराराणी’ या मालिकेत पुन्हा एकदा छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारणार असल्याचे कोल्हे यांनी सांगितले आहे. त्यांनी सोशल मीडियाद्वारे यासंदर्भात माहिती दिली आहे(Dr. Amol Kolhe will play the role of Chhatrapati Shivaji Maharaj).

नुकताच त्यांनी आपला शब्द पाळत आपली बोली किती स्पष्ट आहे हे दाखवून दिले. डॉ. अमोल कोल्हे हे शिरूर मतदार संघाचे खासदारदेखील आहेत. व ते काल बुधवारी बैलगाडा शर्यतीत घोडीवर ‘स्वार’ झाल्याचे पाहायला मिळाले. यामुळे ते बहुचर्चित ठरत आहे. अमोल कोल्हे ‘स्वराज्य सौदामिनी ताराराणी’ या मालिकेतून पुन्हा एकदा छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारणार आहेत.

डॉ. अमोल कोल्हेंनी आपल्या इंस्टाग्राम अकाऊंट वर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वेशभूषेतील फोटो पोस्ट केला आहे. आणि हा फोटो शेअर करत कॅपशन मध्ये त्यांनी लिहिले आहे,”जवळपास सहा महिन्यांनंतर योग आला पुन्हा ते गारूड अनुभवण्याचा, पुन्हा नतमस्तक होण्याचा, पुन्हा पडद्यावर ‘महाराज’ साकारण्याचा! आणि खाली स्वराज्य सौदामिनी ताराराणी! या मालिकेचे नाव दिले आहे. व लवकरच पडद्यावर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भूमिकेत झळकणार असल्याचे संकेत दिले आहे(Dr. Amol Kolhe has posted a photo of Chhatrapati Shivaji Maharaj in a costume on his Instagram account).

हे सुद्धा वाचा

अमोल कोल्हेंनी घोड्यावर स्वार होऊन मारली बारी

अमोल कोल्हेंच्या चित्रपटातील भूमिकेविरोधात संमिश्र राजकीय प्रतिक्रिया

Dr. Amol Kolhe : डॉ. अमोल कोल्हेंना मतदारसंघात हवीय चित्रनगरी, मुख्यमंत्र्यांकडे केली मागणी

NCP MP rides on horse in bullock cart race, there is a ruckus, know why?

डॉ. अमोल कोल्हेंनी आजवर अनेक ऐतिहासिक मालिकांमध्ये काम केले आहे. ‘स्वराज्य सौदामिनी ताराराणी’ ही मालिका ताराराणीच्या जीवनावर भाष्य करणारी आहे. त्यामुळे ही मालिका पाहण्यासाठी संपुर्ण भारत वाट लावून बसला असणार आहे. पुन्हा एकदा छत्रपती शिवाजी महाराज आपल्याला दिसणार याची उत्सुकता सर्वांना अधिक लागली आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी