27 C
Mumbai
Tuesday, August 2, 2022
घरसंपादकीयमुंबईला श्रीमंत करणारा मराठी माणूस

मुंबईला श्रीमंत करणारा मराठी माणूस

टीम लय भारी

लेखिका : रुपाली केळस्कर
मुंबईला श्रीमंत करणार माणूस म्हणजे नाना ऊर्फ जगन्नाथ शंकर शेठ त्यांची आज पुण्यतिथी आहे. ३१ जुलै १८६५ मध्ये त्यांना देवज्ञा झाली. आज त्यांची पुण्यतिथी आहे. आधुनिक मुंबईचे ‍ श‍िल्पकार म्हणजे नाना शंकर शेठ (मुरकुटे).
नाना म्हणजे मुंबईतला सर्वांत श्रीमंत माणूस. पैशांनी आणि मनाने देखील. त्या वेळच्या लाखो मुंबईकरांना रोजी रोटी देणारा माणूस म्हणून लोक त्यांच्याकडे आदराने पाहत होते. त्या काळात भारतावर ब्रिटीशांचं राज्य होतं. परकीयांची सत्ता असतांना देखील ते कोणा समोर वाकले नाहीत. नमले नाहीत आणि झुकले देखील नाहीत. त्यांनी देशहिताचा विचार केला. राज्यातल्या नागरिकांच्या हाताला काम दिलं. त्यांनी मुंबईला संपन्नतेच्या शिखरावर नेऊन ठेवलं.

त्याकाळात आता जे मुंबईत मोठे उदयोजक आहेत. त्यांचे नामोनिशाण देखील नव्हतं. मुंबईच्या प्रगतीमध्ये नानांचा मोठा वाटा आहे. म्हणजेच मराठी माणसाचा मोठा वाटा आहे. ते मुळचे ठाणे जिल्हयातील मुरबाडचे. मुरबाडचे मुरकुटे कुटुंब हे व्यवसायासाठी मुंबईत आले. त्यांचे मराठी, इंग्रजी संस्क्रत भाषेवर प्रभुत्व होते. त्यांनी आपल्या श्रीमंतीचा आणि विव्दतेचा वापर समाज सुधारणेसाठी केला. त्यांनी विविध योजना राबवल्या.

नाना शंकर शेठ यांनी १८२२ मध्ये सका छत्रे यांच्या सहकाऱ्यांने पह‍िली शिक्षण संस्था सुरू केली. १८२४ मध्ये या संस्थेचे बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीमध्ये रुपांतर केले.१८३७ मध्ये एल्फिस्टन कॉलेजची स्थापना केली. तर १८४५ मध्ये जे.जे. मेडिकल कॉलेजची स्थापना केली. १८४८ मध्ये स्टुडन्ट लिटटररी व सायंटिफिक सोसायटीची सुरूवात केली. १८४९ मध्ये स्वत:च्या वाडयात मुलींची शाळा सुरू केली. तर १८५७ मध्ये शंकरशेठ फर्स्ट ग्रेट स्कूलची स्थापना केली. १८५५ मध्ये विधी महाविदयालयाचा पाया घातला.

जे.जे. स्कूल ऑफ आर्टस् स्थापन करण्यामध्ये देखील त्यांचा मोलाचे योगदान आहे. त्यांनी सती प्रथे विरूध्द आवाज उठवला. महापालिकेमध्ये असतांना आरोग्यव्यवस्था, पाण्याची व्यवस्था करण्यात त्यांचा महत्वाचा सहभाग आहे. तसेच मुंबईची लोकल सुरू करण्यात देखील त्यांचा महत्वाचा वाटा आहे. मुंबई ठाणे आणि इतर उपनगरांना मुंबईला जोडण्यात देखील त्यांचा महत्वाचा वाटा आहे.मराठी माणसांबरोबरच मुंबईच्या वैभवात भर टाकली. ती पाराशी लोकांनी. गुजराती, मारवाडी देखील आले. पण जीआयडीसीची स्थापना झाल्यावर आपले उदयोग धंदे घेऊन हेच गुजराती लोकं गुजरातध्ये परत गेले. जातांना त्यांनी इथून काही मराठी कामगार देखील सोबत नेले.

इथला हिरा व्यवसाय, रेडीमेंट गारमेंट उदयोग त्यांनी गुजरातमध्ये नेला. मुंबईत मराठी माणसाला हाताशी घेऊन वाढवलेला उदयोग गुजरातमध्ये नेतांना त्यांनी इथल्या हजारो मराठी कुटुंबांना बेरोजगार केलं. मुंबईचं सौंदर्यं, इथलं वैभव पाहून मुंबई गुजरातमध्ये नेण्याचा घाट घालण्यात आला होता. त्याला बाळासाहेब ठाकरेंनी कडवा विरोध केला होता. राज्यपालांनी मुंबई विषयी केलेल्या वक्तव्यानं संपूर्ण राज्यातील जनता नाराज झाली आहे. आशा भगतसिंह कोश्यारी यांनी एकदा निवांतपणे बसून राज्याचा अभ्यास करावा. इतिहासाचा अभ्यास करावा.भूगोलाचा अभ्यास करावा आणि नंतर विधान करावीत. उगाचच मराठी माणसांची माथी भडकवून वाद निर्माण करु नयेत.

इथला कोळी समाज हा देखील एक पैशांनी संपन्न असलेला एक समाज होता. त्यांची गलबतं समुद्रातून व्यापार करत होती. ते मासेमारी करत होते. त्यांच्याकडे देखील चांगला पैसा होता आणि आजही आहे. सात बेटांवर बसलेली ही मुंबईच मुळी कोळी लोकांची आहे. काळाच्या ओघात सत्ताकारणी त्यांची ओळख मिटवू पाहत आहेत ही दुदैवाची गोष्ट आहे. मुंबईच्या उपनगरात आगरी लोकांची मीठागरं होती. जेवणाला मीठा शिवाय चव येत नाही ते मीठ याच भूमीत पिकवले जात होतं. आगरी हे इथलं भूमीपुत्र मीठाची शेती करत होते.

लोकलच्या दोन्ही बाजूनी पांढऱ्या शुभ्र मीठाच्या राशी डोळयांचं पारणं फेडतं. आता ते वैभव शिल्लक राहिलेलं नाही. पैशांचं आमिष दाखूवन तर कधी जोर जबरदस्तीने इथल्या जमीनी परप्रांतीयांनी हडप केल्या. कवडी मोलानं जमीनी घेतल्या आणि सोन्याच्या भावाने विकल्या. परप्रांतीय बिल्डर मुंबई आणि उपनगरांमध्ये घुसले. त्यांनी मुंबईचं वैभवं वाढलं असं वाटत असलं तरी, देखील त्यांनी आपले हातपाय पसरुन लोकसंख्या वाढीला बळं दिलं‍ आणि मुंबईच्या सौंदर्यांला बकाल रूप दिलं. कारण मराठी माणसांनी त्यांना जवळ घेतलं. त्याच मराठी माणसाविषयी बाहेरचे लोकं येऊन उघड उघड बोलू लागले आहेत. खरं तर, मुंबई म्हणजे लक्ष्मीचं दुसरं रूप आहे. तिच्या किनाऱ्यावर पसरलेला विस्तीर्ण आरबी समुद्र म्हणजे क्षीरसागर आहे अशी समस्त मुंबईकरांची धारणा आहे.

हे सुध्दा वाचा :

ईडीच्या कारवाया मराठी माणसांवर का ?

‘मरेन पण शरण जाणार नाही’, ईडीच्या धाडीनंतर संजय राऊतांचा बाणा कायम

शिवसैनिकांनी केला काळया टोपीवाल्या राज्यपालांचा निषेध

 

संबंधित

सर्वात लोकप्रिय

व्हिडीओ गॅलरी

error: Content is protected !!