27.8 C
Mumbai
Saturday, May 4, 2024
Homeसंपादकीयप्रशासनातील (देव) माणसं...

प्रशासनातील (देव) माणसं…

(तुषार खरात) फेसबूकवर हे जुने फोटो सापडले. या फोटोंमध्ये धनंजय मुंडे यांचे खासगी सचिव प्रशांत भामरे व पीए प्रशांत जोशी व मी असे तिघेजण आहोत. या दोन अधिकाऱ्यांना ‘वाईट’ म्हणणारा कोणीही अख्ख्या मंत्रालयात सापडणार नाही. मंत्रालयाचे सोडा, पण सामान्य माणूस सुद्धा या दोन अधिकाऱ्यांचे गुणगान गातो. ‘माझी प्रशांत भामरे किंवा प्रशांत जोशी यांच्यासोबत ओळख आहे’ असे अभिमानाने सांगणारी लोकं शेकड्याने भेटतात. मी सुद्धा त्यातलाच एक. मी ‘सकाळ’मध्ये नोकरी करीत असताना पत्रकार मंगेश चिवटे यांनी प्रशांत जोशी यांच्याशी माझी ओळख करून दिली होती. त्या माध्यमातून पुढे प्रशांत भामरे यांच्याशी ओळख झाली. पुढे मैत्री वाढत गेली. मी ‘सकाळ इन्व्हेस्टीगेशन टीम’चा (SIT) प्रमुख झालो तेव्हा धनंजय मुंडे विरोधी पक्षनेते होते. सरकारविरोधात दारूगोळा जमा करणे हे माझे त्यावेळच्या पत्रकारितेतील प्रमुख काम होते. विरोधी पक्षनेत्याचे पीएस व पीए या नात्याने भामरे साहेब व जोशी साहेब यांचेही तेच काम होते. त्यामुळे अनेक सरकारविरोधी फटाके आम्ही वाजवले होते. पण हा मुद्दा अलहिदा.

त्या दोघांंविषयीचे कौतुक सांगण्याचा मुद्दा अजून पुढेच आहे. माझे गाव पांढरवाडी (ता. माण, जि. सातारा). त्यावेळी माझ्या पुढाकाराने व गावकऱ्यांच्या अपाट कष्टाने आम्ही गावात झंझावाती जलसंधारण चळवळ उभी केली होती.
आमच्या या कामाची कीर्ती मोठी पसरली होती. आमिर खान याने आमच्या गावाच्या कामाच्या ‘मोजपट्ट्या’ घेवून वॉटर कपचा आराखडा बनविला होता. अभिनेते सयाजी शिंदे ब्रॅण्ड एम्बेसिडर झाले होते. त्या पार्श्वभूमीवर तुषारचे गाव पाहायला जावूया असे सांगत भामरे साहेब व जोशी साहेब आमच्या पांढरवाडीत आले होते.

हे ही वाचा

‘राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेवर राजकारण करू नये’, हिंदू विश्व परिषदेचं शरद पवार आणि उद्धव ठाकरेंना आमंत्रण

‘पक्ष फुटला की नाही ते कॉंग्रेसने ठरवू नये’

आयोध्येत श्रीरामाच्या मंदिरात ‘या’ पाच मान्यवरांना गाभाऱ्यात प्रवेश

डोंगर, ओढे त्यांनी तुडवून काढले. प्रचंड भटकंती केली होती. सीसीटी, डीप सीसीटी, सिमेंट नाला बांध, माती नाला बांध, पाझर तलाव, लूझ बोल्डर, ओढ्याचे खोलीकरण – रूंदीकरण अशी आम्ही केलेली कामे त्यांनी अशरक्ष: न थकता पाहिली.
सातारा जिल्हा परिषदेचे तत्कालिन जिल्हा परिषदेचे सीईओ व या दोघांचेही जुने बॉस राजेश देशमुख यांनी त्यावेळी आमच्या गावात गाळाने भरलेला व पूर्ण गळका पाझर तलावाचे नुतनीकरण करून दिले होते. ताजे ताजे IAS झाल्यानंतर राजेश देशमुख यांनी सामान्य जनतेसाठी केलेले कदाचित हे पहिलेच काम होते. आपल्या जुन्या बॉसचे हे काम भामरे व जोशी यांनी कौतुकाने पाहिले.आमचे कार्यकर्ते राजेंद्र बोडरे यांच्या घरी सामान्य व्यक्तीप्रमाणे जेवण घेतले. मुंबईकडे निघताना भामरे साहेब यांनी खंत व्यक्त केली व काहीसे भावनिक होवून बोलले, ‘आमच्या साहेब मंत्री असायला हवे होते. कोणत्याही योजनेतून तुमच्या गावात काहीतरी काम केले असते.’

सर, भविष्यात कधीतरी ती संधी मिळेल, असा भाबडा आशावाद त्यावेळी मी व्यक्त केला होता.
आता हे आठवण्याचे कारण म्हणजे काही महिन्यांपूर्वी धनंजय मुंडे यांच्याकडे कृषी खाते आले. भामरे साहेब व जोशी साहेब अनुक्रमे PS व PA म्हणून त्यांच्यासोबत रूजू झाले. मंत्रालयात भामरे साहेब यांना भेटायला गेलो तेव्हा, त्यांनी पहिला प्रश्न केला, ‘तुषार, गावांत सध्या काय काय कामे सुरू आहेत ? कृषी खात्याच्या माध्यमातून तुमच्या गावात चांगलं काही करण्यासारखं असेल तर नक्की सांगा, अशी आग्रही सुचना त्यांनी केली. एवढ्यावरच ते थांबले नाहीत. तुम्ही गावात काही चांगलं केलं असेल तर ते सुद्धा सांगा. त्याचा आधार घेवून महाराष्ट्रातील अन्य गावांतही तुमच्यासारखा उपक्रम राबवता येईल. थोडक्यात सामान्य लोकांसाठी चांगल्या उपक्रमांची अदलाबदल करण्याची त्यांनी इच्छा बोलून दाखविली. ‘कोरोना’नंतर आमच्या गावातील लोकचळवळ पूर्णपणे थांबली आहे. अगदी मृतावस्थेत गेली आहे. ती पुन्हा जिवंत करायची राहून राहून इच्छा होत असते. पण आमचे गावकरी पुन्हा तेवढ्याच ताकदीने उभे Switch का ? हा मोठा प्रश्न आहे.
गावकऱ्यांनी एक पाऊल पुढे टाकले तर भामरे साहेब, जोशी साहेबांसारखी अनेक देव माणसे मदतीसाठी तयारच आहेत.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी