31 C
Mumbai
Saturday, May 18, 2024
Homeराजकीय'पक्ष फुटला की नाही ते कॉंग्रेसने ठरवू नये'

‘पक्ष फुटला की नाही ते कॉंग्रेसने ठरवू नये’

राज्यामध्ये आगामी लोकसभा निवडणुकांवरून सत्ताधारी आणि विरोधी पक्षांमध्ये जागावाटप सुरू आहे. याच जागावाटपाच्या मुद्द्यावरून युतीतील पक्षांमध्ये तू तू आणि में में अशी गत झालेली पाहायला मिळत आहे. शिवसेना पक्षाचे आधीच दोन गट झाले आहेत. अगदी त्याचप्रमाणे राष्ट्रवादी शरद पवार गटामध्ये देखील शरद पवार गट आणि अजित पवार गट असे दोन गट झाले आहेत. अशातच आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक पक्षांमध्ये जागावाटपांवरून चर्चा सुरू आहे. यामध्ये शिवसेना उद्धव ठाकरे गटाने २३ जागांवर दावा केला आहे. मात्र कॉंग्रेस पक्षाचा शिवसेना ठकरे गटाला २३ जागा न देण्याचा निर्णय आहे. यामुळे आता आगामी निवडणुकीला एक वेगळं वळण मिळालं आहे.

कॉंग्रेस नेते के.सी.वेणुगोपाल यांनी दिल्लीमध्ये महाराष्ट्रातील कॉंग्रेस नेत्यांची बैठक बोलावली होती. राज्यातील कॉंग्रेस नेत्यांच्या ठाकरे गट २३ जागांवर दावा करू शकत नसल्याच्या प्रतिक्रिया येऊ लागल्या. कारण अनेक खासदार पक्ष सोडून गेले आहेत. पक्ष पुटलेला आहे शरद पवारांच्या राष्ट्रवादीबाबतही हेच पाहायला मिळत आहे. त्यांचंही तेच झालं असल्याचं बोललं जात आहे. याबाबत आता शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांना प्रश्न विचारला असता ते उत्तरले आहेत.

हे ही वाचा

आयोध्येत श्रीरामाच्या मंदिरात ‘या’ पाच मान्यवरांना गाभाऱ्यात प्रवेश

चंद्रकांत पाटीलांचं सोलापूरवरील प्रेम, विकासकामांसाठी आणणार मोठा निधी

मुंबई विद्यापीठाचे माजी परीक्षा नियंत्रक प्रकाश वाणी यांचं निधन

काय म्हणाले संजय राऊत?

‘पक्ष फुटला की नाही कॉंग्रेस ठरवू शकत नाही. आमदार निघून जातात, खासदार निघून जातात. पण त्या पक्षाला मानणारा मोठा मतदार वर्ग असतो, तो जागेवरच आहे. त्यामुळे शिवसेनाने २३ जागा सातत्याने लढल्या आहेत. आमचे १८ लोकं निवडून आले आहेत. त्यापैकी काही पक्ष सोडून गेले. त्या २३ जागांवर शिवसेना लढणारच. आमची भूमिका आधी अशी होती की आधी लढलेल्या आणि जिंकलेल्या जागांवर चर्चा करू. कॉंग्रेसकडे कोणती जिंकलेली जागा आहे. कॉंग्रेसला शुन्यातून चर्चा करायची असेल तर आम्हाल कॉंग्रसची चर्चा करावी लागेल’, असं संजय राऊत म्हणाले आहेत.

‘२३ जागा लढणार हे मी अत्यंत काळजीपूर्वक सांगत आहे. राज्यातील काही लोकं टीप्पणी करत असतील पण आम्ही त्याकडे दुर्लक्ष करतो. कारण आम्ही दिल्लीतील वरिष्ठ नेत्यांशी संवाद साधतो’, असं म्हणत संजय राऊत यांनी जागा वाटपावरून कॉंग्रेसचे कान टोचले आहेत.

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी