24 C
Mumbai
Sunday, March 3, 2024
Homeराजकीयश्रीरामाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी शरद पवार, उद्धव ठाकरेंनाही निमंत्रण, विहिंपचे मोठे मन

श्रीरामाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी शरद पवार, उद्धव ठाकरेंनाही निमंत्रण, विहिंपचे मोठे मन

अनेक वर्षांपासून राम मंदिराचा प्रश्न जसाच्या तसाच होता. अनेक वर्षांपासून राम मंदिरासाठी कित्येक तरुण, देशवासी, हिंदू मारले गेले आहेत. अशातच आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सत्तेत राम मंदिराचे काम पूर्ण झालं आहे. राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेसाठी काहीच दिवस शिल्लक राहिले आहेत. यावर आता काही नेत्यांना राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेसाठी निमंत्रित केलं नसल्याचं बोललं जात आहे. स्वतः राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी निमंत्रण न दिल्याचं सांगितलं. मात्र शरद पवार आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना विश्व हिंदू परिषदेने राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेसाठी निमंत्रण दिलं आहे. यामध्ये राजकारण आणू नये असं देखील विश्व हिंदू परिषदेचे कार्याध्यक्ष आलोक कुमार यांचं म्हणणं आहे.

काय म्हणाले आलोक कुमार?

राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेसाठी आम्ही सर्वच नेत्यांना आमंत्रित केल्याचं आलोक कुमार म्हणाले आहेत. आम्ही कोणालाही आमंत्रण देण्यापासून टाळलं नाही. सर्वांनी सोहळ्याला यावं. हा सर्वात शुभ सोहळा असून त्यामध्ये राजकारण नको, अशी माहिती त्यांनी लोकमत माध्यमाला दिली आहे.

हे ही वाचा

‘पक्ष फुटला की नाही ते कॉंग्रेसने ठरवू नये’

आयोध्येत श्रीरामाच्या मंदिरात ‘या’ पाच मान्यवरांना गाभाऱ्यात प्रवेश

चंद्रकांत पाटीलांचं सोलापूरवरील प्रेम, विकासकामांसाठी आणणार मोठा निधी

लालूप्रसाद यादव आणि अरविंद केजरीवाल यांना निमंत्रण

समाजवादी पार्टीचे अध्यक्ष अखिलेश यादव, राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनाही निमंत्रित केले असल्याचं आलोक कुमार म्हणाले आहेत.

मनोरंजनविश्वातील दिग्गजांना निमंत्रण

दरम्यान या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी देशभरातून सामान्य जनता येणार आहे. याचसह टीम इंडियाचा माजी क्रिकेटर सचिन तेंडुलकर, उद्योजक मुकेश अंबानी त्याचप्रमाणे मनोरंजन विश्वातील अमिताभ बच्चन, रजनीकांत, माधुरी दिक्षीत यांना चित्रपट निर्माता मधुर भंडारकर यांना राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेसाठी निमंत्रण दिलं होतं.

मुख्य पाच मान्यवरांना गाभाऱ्यात प्रवेश

राम मंदिरामध्ये प्रमुख नरेंद्र मोदी, आरएसएस प्रमुख मोहन भागवत, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, युपीचे राज्यपाल आनंदीबेल पटेल आणि मुख्य आचार्य गाभाऱ्यामध्ये असणार आहे. २२ जानेवारी २०२४ रोजी राम मंदिरामध्ये प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडणार आहे.

आयोध्येतील विमानतळाचे होणार नामकरण?

त्याचप्रमाणे त्यांनी अयोध्येतील विमानतळाच्या नामकरणाबद्दल सांगितलं आहे. महर्षी वाल्मिकी असं त्या विमानतळाचं नाव देण्यात येणार आहे. याआधी हे विमानतळ मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम अयोध्या आंतरराष्ट्रीय विमानतळ नावाने ओळखले जात होते.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी