36 C
Mumbai
Friday, April 26, 2024
Homeएज्युकेशनमिरज महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना 'इंडस्ट्रियल ऍडव्हान्स एक्सल'ची नवसंजीवनी; बी.के. एक्सेलचा सामंजस्य करार

मिरज महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना ‘इंडस्ट्रियल ऍडव्हान्स एक्सल’ची नवसंजीवनी; बी.के. एक्सेलचा सामंजस्य करार

मिरज येथील यशवंत शिक्षण संस्थेच्या मिरज महाविद्यालय, वाणिज्य व अर्थशास्त्र विभाग आणि बी. के. एक्सेल नेटवर्क (B.K. Excel Networks) नवी मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने ‘इंडस्ट्रियल ऍडव्हान्स एक्सल’ या शॉर्ट टर्म कोर्सचे उद्घाटन झाले. हा कोर्स तीन महिन्याचा असून एकूण 40 विद्यार्थ्यांनी या कोर्ससाठी आपली नावे नोंदवली आहेत. या कोर्सच्या उद्घाटन समारंभासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर ए.आर. जाधव, विज्ञान विभागाचे उपप्राचार्य व अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक प्राध्यापक एस. पी. पाटील, त्याचप्रमाणे नवी मुंबई येथील या कोर्सचे प्रशिक्षक बिरू कोळेकर हे उपस्थित होते.

1991 नंतर भारताने स्वीकारलेल्या उदारीकरण, खाजगीकरण आणि जागतिकीकरण या धोरणामुळे देशात औद्योगिक विस्तार फार मोठ्या प्रमाणात झाला आहे. खाजगी क्षेत्र प्रचंड प्रमाणात वाढले आहे. आज देशात एका उच्च शिक्षण घेतलेल्या पदवीधरांची संख्या कितीतरी पटीने वाढलेली आहे आणि ते सर्व नोकरीच्या, कामाच्या संधी शोधत आहेत परंतु त्यांना काम मिळत नाही त्यामुळे ते बेकार आहेत अशी परिस्थिती दिसते; पण दुसऱ्या बाजूने पाहिल्यास आज असंख्य उद्योगात, व्यवसायिक प्रकल्पात, व्यवस्थापनात काम करणारे योग्य पात्रतेचे पदवीधर मिळत नाहीत अशी खंत व्यक्त केली जाते. हा मोठा विरोधाभास भारत देशात दिसून येतो याचे एकमेव कारण म्हणजे आजची शिक्षण प्रणाली सैद्धांतिक ज्ञान देणारी असून व्यवहारिक, प्रात्यक्षिक ज्ञान मिळवून देण्यात कमी पडते.

सैद्धांतिक ज्ञानाला प्रात्यक्षिक ज्ञानाची जोड प्रकारची शिक्षण प्रणाली विकसित करणे आवश्यक आहे. ही बाब लक्षात घेऊन मिरज महाविद्यालयातील अर्थशास्त्र व वाणिज्य विभागाने संगणकातील एम.एस.एक्सेल या गणिती प्रक्रिया सुलभ करणाऱ्या ॲप्लिकेशनचे अद्ययावत ज्ञान मुलांना मिळावे आणि विविध औद्योगिक आस्थापनातील विभागात नोकरीच्या अर्थात कामाच्या संधी मुलांना उपलब्ध करून द्याव्यात या हेतूने ‘इंडस्ट्रियल ऍडव्हान्सड एक्सल’ या शॉर्ट टर्म कोर्सचे आयोजन करून त्याची सुरुवात केली आहे हे स्तुत्य उपक्रम आहे. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य ए.आर. जाधव सर यांनी एम.एस.एक्सेल या ॲप्लिकेशनचे महत्त्व विशद करताना म्हणाले की आज विविध क्षेत्रात संशोधनाचे जे काम केले जाते आणि विविध प्रकारचे डायग्राम्स जे काढले जातात यासाठी सुद्धा एम.एस.एक्सेल हे आपलिकेशन अत्यंत उपयुक्त आहे. वाणिज्य आणि अर्थशास्त्राच्या विद्यार्थ्यांना तर याची नितांत गरज आहे. या कोर्स मधील सहभागी विद्यार्थ्यांना एक्सेलचे प्रशिक्षण देण्यासाठी मायक्रोसॉफ्टचे अधिकृत ट्रेनर मा.बिरु कोळेकर यांच्या बी.केज एक्सेल नेटवर्क या संस्थेशी महाविद्यालयाने सामंजस करार केला आहे.

हे सुद्धा वाचा :

Maharashtra Budget 2023 : ‘भरीव शिष्यवृत्ती ते नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालये’ यंदाच्या बजेटमधील शैक्षणिक सुविधा जाणून घ्या

शिक्षण पद्धतींच्या अदलाबदलीमुळे ब्रिटीश भारतीयांपेक्षा साक्षर; मोहन भागवत

क्रिप्टोकरन्सीला मोदी सरकारची मान्यता आहे का? जाणून घ्या नवा कायदा …

याप्रसंगी अर्थशास्त्र व वाणिज्य विभागाचे प्रमुख . आर. डी. जेऊर, कला व विज्ञान विभागाचे उपप्राचार्य श्रीमती.डॉ. एस पी पाटील, संस्थेचे संचालक प्रा. मेटकरी सर, ज्युनिअर विभागाचे उपप्राचार्य प्रा. बी यु पाटील उपस्थित होते या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व उपस्थितांचे स्वागत या कोर्सचे कन्व्हेनर प्रा.सौ. के आर माने यांनी केले. उपस्थितांचे आभार प्रा. विशाल घोरपडे यांनी मानले. प्रा. भंडारे यांनी सूत्रसंचालन केले. याप्रसंगी वाणिज्य विभागातील प्रा. कु. धुळे, प्रा. कु. जाधव व प्रा. पूजा गायकवाड मॅडम, संगणक विभागाचे प्रा.चौगुले सर उपस्थित होते.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी