28.1 C
Mumbai
Friday, May 3, 2024
Homeटॉप न्यूजअखेर शरद पवार भीमा कोरेगाव प्रकरणी आयोगासमोर हजर राहणार, पत्राद्वारे दिली माहिती

अखेर शरद पवार भीमा कोरेगाव प्रकरणी आयोगासमोर हजर राहणार, पत्राद्वारे दिली माहिती

टीम लय भारी

मुंबई : राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार हे अखेर भीमा कोरेगावप्रकरणी आयोगासमोर हजर राहणार आहेत. त्यांनी लेखी पत्राद्वारे आयोगाला कळवले आहे. अशी माहिती राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी माहिती दिली आहे(Sharad Pawar will appear before the commission in Bhima Koregaon case).

शरद पवार हे भीमा कोरेगाव प्रकरणी आयोगासमोर कधी येणार याची चर्चा खूप दिवसांपासून सुरू आहे. पण पुढील काही दिवसात ते आयोगासमोर उपस्थित राहणार अस त्यांनी आयोगाला लेखी पत्राद्वारे कळवल आहे. मात्र, कधी उपस्थित राहणार हे ठामपणे कळवलं नाही आहे. परंतु याकडे लक्ष देता पवार नेमके आयोगाकडे काय बाजू मांडणार आहेत? कोणते मुद्दे आयोगाकडे सादर करणार आहेत? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. तसेच आयोगांकडून पवारांना काय प्रश्न विचारली जाणार याकडेही सर्वांचं लक्ष लागलं आहे.

भीमा कोरेगाव प्रकरणात बऱ्याचदा शरद पवार यांना आयोगाने बोलावले होते. परंतु चौकशीसाठी ते आयोगासमोर येत न्हवते. त्यांच्या न येण्यामागचे कारणही देत न्हवते. येत्या काही दिवसातच माझी बाजू मांडणार आहे अशी माहिती त्यांनी लेखी पत्राद्वारे दिली आहे. आणि त्यामुळे पवारसाहेब नक्कीच आयोगासमोर हजर होतील आणि आपले मत मांडतील असेही नवाब मलिक यांनी सांगितले.

हे सुद्धा वाचा

भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणी शरद पवारांना नोटीस; साक्ष नोंदवण्यासाठी राहावे लागणार उपस्थित!

शरद पवार म्हणाले, राष्ट्रवादीत नवे आर. आर. पाटील उदयाला येत आहेत

शरद पवारांनी केले मोदींचे कौतुक

Sharad Pawar not to appear before Koregaon-Bhima probe panel on Feb 23-24

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी