30 C
Mumbai
Sunday, May 5, 2024
Homeएज्युकेशनएमपीएससीकडून पीएसआय पदासाठी शारीरिक चाचणीची तारीख जाहीर, तब्बल दोन वर्षानंतर मुहूर्त

एमपीएससीकडून पीएसआय पदासाठी शारीरिक चाचणीची तारीख जाहीर, तब्बल दोन वर्षानंतर मुहूर्त

टीम लय भारी

मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने तब्बल दोन वर्षानंतर (महाराष्ट्र दुय्यम सेवा) पीएसआय पदाच्या शारीरिक चाचणीच्या तारखा केल्या जाहीर केल्या आहेत. 2019 साली पीएसआय पदाची मुख्य परीक्षा झाली होती. 19 नोव्हेंबर ते 3 डिसेंबरदरम्यान पुणे, नाशिक आणि कोल्हापूर या ठिकाणी पीएसआय पदासाठी शारीरिक चाचणी घेतली जाणार आहे (MPSC announces date of physical test for PSI post).

496 पदांसाठी राबवली जाणार शारीरिक चाचणीची प्रक्रिया

तब्बल दोन वर्षानंतर एमपीएससीने ( महाराष्ट्र दुय्यम सेवा ) पीएसआय पदासाठी घेण्यात येणाऱ्या शारीरिक चाचणीची तारीख जाहीर केली आहे.  2019  साली पीएसआय पदाची मुख्य परीक्षा झाली होती. त्यानंतर आतापर्यंत म्हणजेच तब्बल दोन वर्षांपासून ही भरती प्रक्रिया रखडली होती.

सिंधुदुर्ग किल्ला महाराजांनी बांधला, कोणतरी बोलेलं मी बांधला, मुख्यमंत्र्यांचा नारायण राणेंवर पलटवार

विमानतळ उद्घाटनाला विनायक राऊतांनी दिवसाचे २४ तास आणि वर्षांचे १२ महिने पाठपुरावा केला : सुभाष देसाई

कोरोना, मराठा आरक्षणाचा मुद्दा तसेच एमपीएससीच्या दिरंगाईपणामुळे ही भरती प्रक्रिया लांबली होती. मात्र आता शेवटी आयोगाना पीएसआय पदासाठी घेण्यात येणाऱ्या शारीरिक चाचणीचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. 19 नोव्हेंबर ते 3 डिसेंबर दरम्यान पुणे, नाशिक, आणि कोल्हापूर या शहरांत शारीरिक चाचणी घेण्यात येणार आहे. 496 पदांसाठी ही शारीरिक चाचणीची प्रक्रिया राबवली जात आहे.

राज्यसेवा पूर्व परीक्षा 2021 साठी 100 पदं वाढवली

ज्योतिरादित्य शिंदेंनी मराठी लोकांची मने जिंकली

MPSC Rajyaseva Exam 2021: Apply for 290 posts at mpsconline.gov.in

तर दुसरीकडे महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं राज्यसेवा पूर्व परीक्षा 2021 साठी आमखी 100 जागा वाढवल्या आहेत. या जाहिरातीप्रमाणे एकूण  290 पदांसाठी 16 संवर्गात भरती होणार होती. मात्र, आता ही पदसंख्या वाढवण्याचा निर्णय आयोगाने घेतला आहे. आयोगाने थेट 100 पदं वाढवली आहेत. त्यामुळे आता 390 पदांसाठी 2 जानेवारी 2022 ला एमपीएससीकडून राज्य सेवा पूर्व परीक्षा आयोजित केली जाईल. पदांच्या संख्येत वाढ झाल्यानं विद्यार्थ्यांनी आनंद व्यक्त केला आहे. त्यासाठी आज एमपीएससीनं नवीन परिपत्रक जारी केलंय. यामध्ये एकूण 20 संवर्गात 390 पदांची जाहिरात करण्यात आली आहे. क्लास 1 ( गट अ च्या ) 100 जागा वाढल्याने उमेदवारांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी