31 C
Mumbai
Thursday, May 2, 2024
Homeएज्युकेशनमहाराष्ट्रातील तरुणांना शासकीय सेवेत दाखल होण्याची सुवर्णसंधी !

महाराष्ट्रातील तरुणांना शासकीय सेवेत दाखल होण्याची सुवर्णसंधी !

टीम लय भारी

मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोग गट ‘ब’ अंतर्गत बंपर भरती निघाली आहे. ‘एमपीएससी’मध्ये एकूण ८०० जागांची भरती निघाली आहे. गट ‘ब’ अंतर्गत नॉन गॅजेट रिक्त पदे भरली जाणार आहेत. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून याबाबतची जाहिरात काढण्यात आली आहे. ही जाहिरात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अधिकृत वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात आली आहे.

महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागांतर्गत चार संवर्गातील एकूण ८०० पदांच्या भारतीकरिता महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत महाराष्ट्र दुय्यम सेवा राजपत्रित, गट ‘ब’ संयुक्त पूर्व परीक्षा – २०२२ चे परिपत्रक जाहीर करण्यात आले आहे. शनिवार दि. ८ ऑक्टोबर, २०२२ रोजी महाराष्ट्रातील एकूण ३७ जिल्हा केंद्रावर परीक्षा घेण्यात येणार आहे. या परीक्षेसंदर्भातील संपूर्ण माहिती mpsc.gov.in वर प्रसिद्ध करण्यात आली आहे.

यावेळी गट ‘ब’ अंतर्गत सहायक कक्ष अधिकारीमध्ये ४२ जागा, राज्य कर निरीक्षक अंतर्गत ७७ जागा, पोलीस उपनिरीक्षक अंतर्गत सर्वाधिक अशा ६०३ जागा आणि दुय्यम निबंधक (श्रेणी-१)/ मुद्रांक निरीक्षक अंतर्गत ७८ जागा भरण्यात येणार आहेत. या पदांच्या जागांसाठी दि. २४ जून, २०२२ पासून अर्ज करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. १५ जुलै, २०२२ पर्यंत इच्छुक उमेदवारांना या परीक्षेसाठी अर्ज करण्यात येणार आहेत. तीन टप्प्यामध्ये ही परीक्षा घेण्यात येणार असून तिन्ही टप्पे उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची नोकरीसाठी निवड करण्यात येणार आहे.

https://mpsc.gov.in/downloadFile/english/5144 या पीडीएफमध्ये या परीक्षेसंदर्भातील सर्व माहिती देण्यात आहे. तर http://mpsconline.gov.in या लिंकवर जाऊन पात्र किंवा इच्छुक उमेदवारांना अर्ज करण्यात येणार आहे.

हे सुद्धा वाचा :

यंदा आयटीआय प्रवेशासाठी दीड लाख जागा उपलब्ध

राज्य सरकारकडून मेगा भरती; दीड हजार लिपिकांची पदे भरणार

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी