29 C
Mumbai
Thursday, May 2, 2024
Homeराजकीयमहाराष्ट्राला भिकेला लावू इच्छिणाऱ्या 'खेकडा'फेम तानाजी सावंतांची 'लफडी' बाहेर येणार !

महाराष्ट्राला भिकेला लावू इच्छिणाऱ्या ‘खेकडा’फेम तानाजी सावंतांची ‘लफडी’ बाहेर येणार !

टीम लय भारी

मुंबई : परांडा विधानसभेचे बंडखोर आमदार तानाजी सावंत यांचा शिवसैनिकांकडून तीव्र निषेध करण्यात येत आहे. काही महिन्यांपूर्वी तानाजी सावंत यांनी महाविकास आघाडी सरकार विरोधात उघड नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळे ते सरकारमध्ये असून पण खुश नसल्याचे त्यावेळी समोर आले होते. म्हणून शिवसेनेचे नाराज आमदार फोडण्यात तानाजी सावंत यांची मुख्य भूमिका असल्याचे बोलले जात आहे.

तानाजी सावंत हे सुरुवातीपासूनच एकनाथ शिंदे यांचे जवळचे सहकारी मानले जातात. त्यांनी बंडखोरी केल्यानंतर शिवसैनिकांनी त्यांच्याविरोधात सर्वाधिक संताप व्यक्त केला. ‘तानाजी सावंत… उद्यापासून ३० वर्षांपासून केलेली सगळी लफडी बाहेर काढणार…’ अशी पोस्ट एका शिवसैनिकाने केलेली आहे. त्यामुळे तानाजी सावंत यांनी गेल्या ३० वर्षात नेमकी किती आणि कोणती लफडी केली आहेत? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

तानाजी सावंत यांनी काही महिन्यांआधी महाविकास आघाडीमधील राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसकडून शिवसैनिकांची घुसमट होत असल्याचे जाहीर वक्तव्य सोलापुरातील एका कार्यक्रमात केले होते. त्याचवेळी तानाजी सावंत हे या सरकारमध्ये खुश नसल्याचे जगजाहीर झाले होते. सर्वात प्रथम तानाजी सावंत यांनीच महाविकास आघाडीमधील खदखद बोलून दाखविली होती. म्हणून आता राज्यात आलेल्या या राजकारणाच्या वादळामध्ये तानाजी सावंत यांचीच मुख्य भूमिका असल्याचे शिवसैनिकांकडून बोलले जात आहे. तानाजी सावंत यांनी बंडखोरी केल्यानंतर त्यांच्याविरोधात पुण्यात निदर्शने करण्यात आली. पुण्यामध्ये तानाजी सावंत यांच्या शिक्षण संस्था असून शिवसैनिकांनी त्यांच्या शिक्षण संस्थांसमोर तीव्र आंदोलन केले.

महाराष्ट्राला भिकेला लावण्याचे वादग्रस्त विधान

तानाजी सावंत यांनी एका भाषणात वादग्रस्त विधान केले होते. ‘मी अख्ख्या महाराष्ट्राला भिकेला लावेन. पण माझं कुणी काही बिघडवू शकत नाही’ असे विधान त्यांनी साधारण पाच – सहा वर्षांपूर्वी केले होते. या विधानामुळे महाराष्ट्रातील जनतेने सावंत यांचा खरपूस समाचार घेतला होता.

‘खेकडा’फेम तानाजी सावंत
२०१९ मध्ये चिपळूण मधील तिवरे धरण फुटून मोठी दुर्घटना घडली होती. त्यावेळी तानाजी सावंत हे जलसंधारण मंत्री होते. या दुर्घटनेत २१ जणांचा जीव गेला होता. या घटनेनंतर तानाजी सावंत यांनी जाऊन घटनास्थळाची पाहणी केली होती. या धरणात सर्वाधिक खेकडे असल्याचे गावकऱ्यांनी सांगितले होते. खेकड्यांनी धरण टोकरले त्यामुळे तिवरे धरण फुटल्याचा अजब दावा तानाजी सावंत यांनी केला होता. त्यावेळी त्यांच्यावर जोरदार टीका झाली होती.

मंत्रीपद दिले नाही म्हणून उद्धव ठाकरेंवर नाराज

देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळात तानाजी सावंत यांच्या जेमतेम सहा – सात महिन्यांसाठी जलसंधारण मंत्री पद दिले होते. नंतर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकार सत्तेत आले. या सरकारमध्ये त्यांना मंत्रीपद मिळाले नाही. त्यावर तानाजी सावंत नाराज झाले होते. त्यांनी तेव्हाच भाजपसोबत लगट साधली होती. आता एकनाथ शिंदे यांनी बंड करताच ते शिंदे यांच्या टोळक्यात सामील झाल्याचे बोलले जात आहे.

हे सुद्धा वाचा :

एकनाथ शिंदे गटाविरोधात शिवसैनिकांचे सोशल मीडियात जोरदार ‘कॅम्पेन‘!

मंत्री संदीपान भुमरे यांनी गद्दारी केल्यानंतरही त्यांना ठाकरे सरकारकडून गिफ्ट

उद्धव ठाकरेंचा आरोप; भाजपला शिवसेना संपवायची आहे

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी