28 C
Mumbai
Sunday, February 18, 2024
Homeमनोरंजनअजय देवगणचा 'सिंघम३' येणार, अभिनेत्री कोण असणार ?

अजय देवगणचा ‘सिंघम३’ येणार, अभिनेत्री कोण असणार ?

अजय देवगणची महत्वाची भूमिका असलेल्या ‘सिंघम३’ च्या शूटिंगला शनिवारपासून सुरुवात झाली. शूटिंगच्या सेटवर मुहूर्त पूजा आटोपत चित्रपटाचा श्रीगणेशा झाला. यावेळी अभिनेता अजय देवगण आणि दिग्दर्शक रोहित शेट्टीसह अभिनेता रणवीर सिंघमच्या वेषात उपस्थित होते. सिंघम ३मध्ये रणवीर सिंग आणि अक्षय कुमारच्याही महत्वाच्या भूमिका आहेत.

२०११ साली रोहित शेट्टीनं पोलिसांच्या आयुष्यावर चित्रपट निर्माण करण्यास सुरुवात केली. रोहितनं अजय देवगणला सोबत घेत सिंघम चित्रपट केला. धमाककेदार ऍक्शन, स्टंट सीन्समुळे सिंघमने प्रेक्षकांवर वेगळीच जादू केली. सिंघमची क्रेझ पाहता रोहित शेट्टी आणि अजय देवगणनं चार वर्षानंतर ‘सिंघम अगेन’ चित्रपटाची निर्मिती केली. त्यानंतर पोलिसांच्या दुनियेत रोहितनं रणवीर सिंगला सोबत घेत ‘सिंबा’ चित्रपटाची निर्मिती केली. २०१८ साली प्रदर्शित झालेल्या ‘सिंघम’ला तुफान यश मिळालं. या सिनेमात सिंबाच्या मदतीसाठी सिंघम धावून आला. सिनेमाच्या शेवटी अजयनं धम्माल उडवून दिली. त्याचवेळी अक्षय कुमारही पोलिसांच्या दुनियेत प्रवेश करत असल्याची घोषणा झाली.

हे सुद्धा वाचा 
असं काय घडलं…. चित्रपट नयनताराचा चर्चा दीपिकाची!
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आवडतात हे पदार्थ..
कोकणकरांना गणेशोत्सवाला गावी जाण्यासाठी भाजपची नमो एक्स्प्रेस धावली!

२०२१ साली अक्षय कुमारचा ‘सूर्यवंशी’ चित्रपट प्रदर्शित झाला. ‘सूर्यवंशी’मध्ये सिंबा आणि सिंघम मिळून सगळेच दहशतवाद्यांची धुलाई करताना दिसले. आता दोन वर्षानंतर ‘सिंघम३’चं शूटिंग सुरु होतंय. त्यासाठी अजयसोबत रणवीर सिंग सेटच्या पहिल्याच दिवशी शूटिंगसाठी हजर राहिला. अक्षय परदेशात असल्यानं मुहूर्ताला हजर राहू शकला नाही. अक्षयनं इंस्टाग्रामवर पूजेचा फोटो पोस्ट करत सहकाऱ्यांना शुभेच्छा दिल्या. सिंघमच्या पहिल्या भागात अभिनेत्री काजल दिसून आली. दुसऱ्या भागात काजलची जागा करिना कपूर खाननं घेतली. आता तिसऱ्या भागात कोणत्या अभिनेत्रीची वर्णी लागतेय हे अद्यापही गुलदस्त्यात आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी