25 C
Mumbai
Saturday, February 24, 2024
Homeमनोरंजन'आला बैलगाडा' गाण्यावर अजितदादा फिदा

‘आला बैलगाडा’ गाण्यावर अजितदादा फिदा

मराठी चित्रपटांहून अधिक मराठी अल्बम गाणी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. चित्रपटांच्या गाण्याहून सर्वाधिक अल्बमच्या गाण्यांना पसंती मिळू लागली आहे. मनोरंजनविश्वात खेडेगावातील गाण्यांची झिंग ही सर्वत्र पाहायला मिळत आहे. त्यातल्या त्यात ते गाणं शिंदे शाहीनं गायलं असेल तर सोने पे सुहागाच अनुभवायला मिळतो. याचसोबत हे गाणं अजित पवार यांचे खासगी सचिव अविनाश सोलवट यांच्या मुलीने लिहिलं आहे. अनुष्का सोलवट असं त्यांचं नाव असून त्या सध्या बीग हिट मीडियाच्या डायरेक्टर म्हणून कार्यरत असून या गाण्याच्या निर्मीतीसाठी त्यांनीही मोठा हातभार लावला आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस नेते अजित पवार यांनी या गाण्याचे कौतुक केलं आहे. हे गाणं आदर्श शिंदे यांनी गायलं आहे. आदर्श शिंदे हे मराठी चित्रपटसृष्टीतील गायक म्हणून एक मोठं नाव आहे. राज्यभरात लग्नामध्ये, घरगुती कार्यक्रमांमध्ये इतर ठिकाणी याच गाण्याची झिंग चढली आहे.

बैलगाडा शर्यत हे आदर्श शिंदेंच्या आवाजातील गाणं महाराष्ट्रात धुडगूस घालत आहे. अनेक तरुणांना या गाण्याची भुरळ पडली आहे. हे गाणं सोशल मीडियावर सर्वाधिक गाजत आहे. आता राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना देखील या गाण्याची भुरळ पडली आहे. त्यांनी या गाण्याचे कौतुक केलं असून या गाण्याच्या लेखिका अनुष्का यांचं देखील कौतुक केलं आहे.

हे ही वाचा

अजित पवारांना आदर्श शिंदेंच्या ‘आला बैलगाडा’ गाण्याची भूरळ

नरेंद्र मोदीच देशाचे तिसरे पंतप्रधान; नाना पाटेकरांचं विधान चर्चेत

धनंजय मुंडे ‘कोरोना’ग्रस्त, तरीही कामात व्यस्त

बिग हिट मीडिया प्रस्तुत ‘आला बैलगाडा’

बिग हिट मीडिया प्रस्तुत आणि प्रशांत नाकती मुझिकल आला बैलगाडा या गाण्याचे कौतुक अजित पवार यांनी केलं आहे. अजित पवार यांनी देखील या गाण्याचा आनंद घेतला आहे. लॅपटॉपवर हे गाणं पाहत त्यांनी गाण्याचा आनंद लुटला आहे. त्यांचा व्हिडिओ सर्वत्र व्हायरल होत आहे. याविषयी अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

गाणं पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

काय म्हणाले अजित पवार?

अजित पवार यांनी सर्वांचे कौतुक केलं आहे. संगीतकार प्रशांत नाकती यांच्या सह विशाल फाले, वैष्णवी पाटिल, निक शिंदे आणि रितेश कांबळे या नवख्या कलाकारांनी अतिशय सुंदर काम केले आहे. गाण्याचं लिखाणही चांगलं झालं आहे. इथून पुढील गाणी देखील येणाऱ्या पिढीला आवडतील अशी करावी, असं म्हणत अजित पवार यांनी गाण्याबद्दल प्रतिक्रिया दिली आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी