28 C
Mumbai
Saturday, July 27, 2024
Homeराजकीय'भीमा कोरेगाव कार्यक्रम सरकारच्या निधीतून पार पडावा'

‘भीमा कोरेगाव कार्यक्रम सरकारच्या निधीतून पार पडावा’

१ जानेवारी या दिवशी पुणे जिल्ह्यातील भीमा कोरेगाव येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे अनुयायी दरवर्षी येत असतात. भीमा कोरेगाव येथे विजयस्तंभाला नतमस्तक होतात. हा विजयस्तंभ अनेक वर्षांआधी इंग्रजांनी शौर्याचं प्रतीक म्हणून बांधण्यात आला आहे. याला मानवंदना देण्यासाठी देशभरातून लाखो लोकं येणे आहेत. यासाठी आता पुणे जिल्हा प्रशासन व सामाजिक न्याय व प्रशासन व विशेष सहाय्य विभाग देत असतात. अनुयायांच्या सोयीसुविधांसाठी सामाजिक न्याय विभाग आणि बार्टीचे प्रशासन विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक योजनांसाठी राखीव निधीतून 60 लाख रुपये भोजनासाठी खर्च करणार असल्याचं समजतं.

या विद्यार्थ्यांच्या राखीव निधीतून 60 लाख भोजनासाठी खर्च करण्यासाठी आरपीआय (आर के) चे राष्ट्रीय अध्यक्ष राजाराम खरात आणि महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नामदेव साबळे यांनी पूर्ण विरोध दर्शवला असून याबाबत परिपत्रक जारी करण्यात आलंय. यासाठी विद्यार्थ्यांच्या उर्वरित निधीचा वापर इतर बाबींसाठी खर्च करण्याचा अधिकार हा बार्टीला कोणी दिला आहे, असे वक्तव्य राजाराम खरात यांनी केलं आहे.

हे ही वाचा

‘आला बैलगाडा’ गाण्यावर अजितदादा फिदा

नरेंद्र मोदीच देशाचे तिसरे पंतप्रधान; नाना पाटेकरांचं विधान चर्चेत

मनोज जरांगे-पाटील यांच्या मराठा आरक्षणाची ठिणगी देशपातळीवर

सरकारने निधी द्यावा

भीमा कोरेगाव येथे बार्टीने विद्यार्थ्यांच्या निधीतून 60 लाख रुपये भीमा कोरेगाव येथील कार्यक्रमास खर्च करणार असल्याचं सांगितलं आहे. यावर राजाराम खरात यांनी विरोध दर्शवला असून तुम्हाला हा अधिकार कोणी दिला आहे? असा प्रतीसवाल केला आहे. विजयस्तंभाला मानवंदना देण्यासाठी कार्यक्रम होणार आहे त्यासाठी सरकारकडून निधी घ्यावा अशी मागणी राजाराम खरात आणि अमित साबळे यांनी केली आहे.

भीमा कोरेगाव कार्यक्रमाची जय्यत तयारी

भीमा कोरेगाव येथे विजयस्तंभाला नतमस्तक होण्यासाठी देशातून अनेक आंबेडकर अनुयायी आपली उपस्थिती दाखवणार आहेत. यासाठी 110 एकरमध्ये वाहनतळासाठी जागा उपलब्ध करण्यात आली आहे. तसेच यासाठी 8 हजार पोलिस फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. यासाठी 20 लाखांहून अधिक आंबेडकर अनुयायी येणार असल्याची माहिती समजते.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी