27 C
Mumbai
Saturday, July 27, 2024
Homeमनोरंजननरेंद्र मोदीच देशाचे तिसरे पंतप्रधान; नाना पाटेकरांचं विधान चर्चेत

नरेंद्र मोदीच देशाचे तिसरे पंतप्रधान; नाना पाटेकरांचं विधान चर्चेत

देशामध्ये सध्या मोदीची लाट असल्याचं अनेकांचं म्हणणं आहे. आता केवळ सामान्य नागरिकच नाहीतर आता सेलिब्रिटीही येत्या आगामी निवडणुकांमध्ये नरेंद्र मोदीच पंतप्रधान (Narendra Modi) होणार असल्याचं सागंत आहे. अशातच आता मराठी आणि बॉलिवूडमध्ये अधिराज्य गाजवणारे अभिनयाचा दांडगा अनुभव असणारे नट नाना पाटेकर (Nana patekar) यांनी आगामी निवडणुकाबाबत भाष्य केलं आहे. ते आपल्या ‘ओले आले’ (Ole Aale) या सिनेमाच्या प्रमोशनसाठी हिंदी झी मीडियावर आले असताना आगामी निवडणुकीमध्ये नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा देशाचे पंतप्रधान होणार असल्याचं नाना पाटेकर म्हणाले आहेत. यामुळे या वक्तव्याने नाना पाटेकर आता चांगलेच चर्चेत आले आहेत. काही दिवसांधी ते एका चित्रिकरणाच्या सेटवर चाहत्याच्या कनाखाली वाजवल्याने चर्चेत आले होते. तर आता त्यांनी नरेंद्र मोदींच्या पंतप्रधानपदावर भाष्य केल्यानं चर्चेत आले.

तिसऱ्य़ांदा मोदीच पंतप्रधान – नाना पाटेकर

नाना पाटेकर झी माध्यमाशी बोलत असताना सिनेमाच्या प्रमोशनबाबत बोलत असताना माध्यमांशी त्यांनी आगामी निवडणुकीबाबत भाष्य केलं आहे. यावेळी ते म्हणाले की भाजपला कोणताही पर्याय नाही. तिसऱ्यांदाही नरेंद्र मोदीच देशाचे पंतप्रधान होणार आहेत. यावेळी बोलत असताना त्यांनी भाजप तीनशे ते पाऊणे चारशे जागा जिंकेल असं देखील भाकित केलं आहे. नरेंद्र मोदींबाबत नाना पाटेकरांनी केलेलं वक्तव्य आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

हे ही वाचा

धनंजय मुंडे ‘कोरोना’ग्रस्त, तरीही कामात व्यस्त

मनोज जरांगे-पाटील यांच्या मराठा आरक्षणाची ठिणगी देशपातळीवर

‘माझी लेकरं सरकारच्या स्वाधीन करत आहे’; धनगर आरक्षणासाठी आत्महत्या केलेल्या तरूणाची सुसाईड नोट आली समोर

देशभरामध्ये मोदी सरकार चांगलं काम करत आहे. यामुळे लोकसभेमध्ये त्यांना चांगलं यश मिळेल. भाजपला बहुमत मिळणार आणि पुन्हा एकदा नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान होणार आहेत. दरम्यान आता आगामी लोकसभा निवडणुकीकडे देशाचं लक्ष लागलं आहे. आता यामध्ये नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा निवडून येणार असल्याच्या चर्चा आहेत.

काही दिवसांआधी पाच राज्याच्या निवडणुका झाल्या असून त्या निवडणुकांमध्ये भाजपचं पारडं जड असल्याचं पाहायला मिळालं आहे. दुसरीकडे इंडिया आघाडीनेही आपली बाजू मजबूत करण्याची तयारी सुरू केली आहे. यामुळे आगामी लोकसभेमध्ये भाजपचा विजय होणार असल्याचं नाना पाटेकरांनी भाष्य केलं आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी