33 C
Mumbai
Monday, February 26, 2024
Homeराजकीयधनंजय मुंडे 'कोरोना'ग्रस्त, तरीही कामात व्यस्त

धनंजय मुंडे ‘कोरोना’ग्रस्त, तरीही कामात व्यस्त

तीन वर्षांपूर्वी जगभरामध्ये कोरोनाचं थैमान होतं. यामुळे सर्वच जनसामान्यांचे जीवन विस्कळीत झालं असल्याचं अनुभवायला मिळालं होतं.अशातच आता पुन्हा एकदा देशामध्ये JN.1 या कोरोनाच्या नवीन व्हेरियंटने होत्याचं सर्व नव्हतं करून टाकलं आहे. यावर काही दिवसांआधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे. अशातच आता राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी पुणे येथील निवासस्थानी राहून कृषी शिक्षण आणि संशोधन परिषदेच्या बैठकीस ऑनलाईन पद्धतीने हजेरी लावली आहे. ही बैठक ११३ वी बैठक असून धनंजय मुंडे आता कोरोनाबाधित असले तरीही कामाच्याबाबतीत अॅक्शन मोडवर दिसत आहेत.

कृषी शिक्षण आणि संशोधन परिषदेच्या ११३ व्या बैठकीमध्ये ११२ व्या बैठकीचा कार्यअहवाल आणि इतिवृत्त मंजूरीसाठी सादर करण्यात आल्याची माहिता आता समोर येत आहे. या परिषदेचे धनंजय मुंडे अध्यक्ष असून त्यांनी संबंधित बैठकीसाठी योग्य त्या अधिकाऱ्यांना सुचना दिल्या आहेत.

हे ही वाचा

मनोज जरांगे-पाटील यांच्या मराठा आरक्षणाची ठिणगी देशपातळीवर

‘माझी लेकरं सरकारच्या स्वाधीन करत आहे’; धनगर आरक्षणासाठी आत्महत्या केलेल्या तरूणाची सुसाईड नोट आली समोर

अमोल कोल्हेंना लख लाभ, मी काल सांगितलेलं माझं फायनल; अजित पवारांचा हल्ला बोल

धनंजय मुंडे कोरोनाबाधित

गेली पाच ते सहा दिवस धनंजय मुंडे हे कोरोनाबाधित असल्याची माहिती समोर येत आहे. यामुळे ते गेली पाच ते सहा दिवस पुण्यातील निवासस्थानी आहेत. कोरोना आजाराबाबतचे ते सर्व नियम पाळत आहेत आणि उपचार घेत आहेत. आजपासून त्यांनी ऑनलाइन पद्धतीने कामकाजास सुरुवात केली आहे. एका बाजूला नियम तर दुसऱ्या बाजूला काम अशी दुहेरी भूमिका याठिकाणी धनंजय मुंडे करताना दिसत आहेत.

कोरोनाचा नवीन व्हेरियंट दक्षिण भारतामध्ये आला होता. त्यानंतर आता तो देशातील काही राज्यामध्ये संक्रमित होत आहे. हा व्हेरियंट जलदरीत्या बाधित होतो. यामुळे आता राज्यातील पुणे शहरामध्ये या व्हेरियंटचे संक्रमण होऊ लागले आहे. दरम्यान, धनंजय मुंडे देखील पुण्यामध्येच आहेत. त्यांना काही दिवसांपासून कोरोना झाला असल्याची माहिती समोर आली. तरीही ते आपली काळजी घेत, आपलं कामही करत आहेत.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी