24 C
Mumbai
Sunday, March 3, 2024
Homeमनोरंजन"'ॲनिमल'सारखे सिनेमे यशस्वी होणे चिंताजनक" जावेद अख्तर यांचं मोठं विधान

“‘ॲनिमल’सारखे सिनेमे यशस्वी होणे चिंताजनक” जावेद अख्तर यांचं मोठं विधान

चित्रपट सामान्य जनतेच्या मनोरंजनाचे एक महत्वाचे माध्यम. चित्रपटांच्या माध्यमातून मनोरंजनासोबतच जनजागृतीचे देखील मोठे काम केले जाते. आजच्या काळात तर लोकांच्या आयुष्यावर चांगला वाईट असा कोणताही सर्वात मोठा परिणाम करण्यासाठी चित्रपट कारणीभूत ठरताना दिसत आहेत. यासाठी अनेकदा चित्रपटाच्या निर्मात्यांवर आणि दिग्दर्शकांवर आपण समाजासमोर एक उत्तम चित्रपट सादर करण्याची जबाबदारी असते. मात्र असे असूनही कधी कधी असे सिनेमे तयार होतात जे ब्लॉकबस्टर तर नक्कीच होता, मात्र त्याचा लोकांवर समाजावर चुकीचा परिणाम होऊ शकतो. याचे उत्तम उदाहरण म्हणजे नुकताच प्रदर्शित झालेला ‘ॲनिमल’.

संदीप वांगा रेड्डी दिग्दर्शित ‘ॲनिमल’ सिनेमाने तुफान लाइमलाइट मिळवले सोबतच बॉक्स ऑफिसवर देखील चांगली कमाई केली. मात्र या सिनेमावर सडकून टीका देखील झाली. रणबीर कपूर आणि रश्मिका मंदाना यांची भूमिका असलेल्या या सिनेमात अनेक आक्षेपार्ह्य सीन आणि संवाद होते. ज्यामुळे सिनेमाला, कलाकारांना, दिग्दर्शकांना मोठ्या प्रमाणावर ट्रोलिंगचा सामना करावा लागला. छत्रपती संभाजी नगर इथे भरलेल्या अजिंठा वेरुळ चित्रपट महोत्सवाला जावेद अख्तर यांनी हजेरी लावली होती. यावेळी त्यांनी केलेल्या भाषणात त्यांनी ‘ॲनिमल’ चित्रपटावर टीका करताना असे सिनेमे हिट कसे होऊ शकतात असा सवाल उपस्थित केला.

 

View this post on Instagram

 

A post shared by Animal The Film (@animalthefilm)

हे ही वाचा

अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या मालत्तेच्या लिलावात ‘कशाची’ बोली?

‘शरद मोहोळला त्याच्या जवळच्या साथीदारानं मारलं’, देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य

“८०-८५ वर्षाच्या लोकांनी आशीर्वाद देण्याचे काम करावे”, अजित पवारांचा शरद पवारांना नाव न घेता सल्ला

जावेद अख्तर यांनी केलेल्या भाषणात ते म्हणाले, “चित्रपटातील हिरोची इमेज ही काय योग्य आणि कसे दिसले पाहिजे याची जाणीव ठेवून तयार केली पाहिजे. लेखकांनी लिखाणापुर्वी विचार करायला पाहिजे. सध्या आपला समाज खूप गोंधळात आहे, त्यामुळे लेखकही गोंधळात आहे. समाजात काय योग्य आणि काय अयोग्य याचा गोंधळ आहे.”

जावेद अख्तर यांनी “‘ॲनिमल’ या सिनेमात तृप्ती डिमरीने रणबीर कपूरला फसवल्याचे समजते. सोबतच तृप्ती त्याच्यावरील प्रेमाची कबुली देते. ज्यावर रणबीर तिला “Do You Love Me? Ok then Lick My Shoes” असे म्हणतो. याच प्रसंगाचा उल्लेख करत जावेद अख्तर यांनी अशा स्वरूपाचा सिनेमा हिट होणे ही चिंतेची गोष्ट असल्याचे सांगितले.

पुढे अख्तर साहेब म्हणाले, “मला असे वाटते की, आजच्या काळात चित्रपटांची निर्मिती करणाऱ्यांपेक्षा ते पाहणाऱ्या प्रेक्षकांवर खूप मोठी जबाबदारी आहे. प्रेक्षकांनी ठरवायला पाहिजे की, नक्की त्यांना कसे चित्रपट पाहिजे आणि कसे नकोत.”

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी