25 C
Mumbai
Sunday, March 3, 2024
Homeमनोरंजन"मी खूपच भावनिक...भविष्यात मी..." प्राजक्ता माळीचे राजकीय प्रवेशावर भाष्य

“मी खूपच भावनिक…भविष्यात मी…” प्राजक्ता माळीचे राजकीय प्रवेशावर भाष्य

मनोरंजन क्षेत्र आणि राजकारण यांचा संबंध खूपच जुना आणि घनिष्ठ आहे. अनेक कलाकारांनी राजकारणात प्रवेश करत आपली नवी इनिंग सुरु केली. तर दुसरीकडे काही राजकारणी अभिनय करताना देखील दिसले आहेत. बऱ्याचवेळा नेते मंडळी देखील कलाकारांच्या प्रसिद्धीचा, लोकप्रियतेचा त्यांच्या निवडणुकांच्या प्रचारासाठी उपयोग करून घेतात. कलाकार देखील त्यांच्या चित्रपटांच्या विविध कार्यक्रमांना नेत्यांना आमंत्रण देतात. काही अडचणी आल्यास नेते मंडळींची मदत घेताना दिसतात. त्यामुळे त्यांच्यात मैत्रीपूर्ण संबंध निर्माण होतात. एकूणच काय तर राजकारण आणि कलाकार मनोरंजनविश्व हे जवळचे आहे.

कधी कधी एखादा कलाकार नेते मंडळींसोबत दिसू लागला की, त्याच्या राजकारणात जाण्याबद्दल मीडियामध्ये मोठ्या प्रमाणावर चर्चा होतात. कलाकार राजकारणात जाणे हे नवीन नसले तरी एखादी मोठी आणि लोकप्रिय अभिनेत्री जेव्हा सतत विविध मोठ्या राजकारण्यांसोबत दिसते तेव्हा? असेच काहीसे सध्या घडत आहे, अभिनेत्री प्राजक्ता माळीच्या बाबतीत. नाटक, मालिका, चित्रपट, वेब सीरिज अशा सर्वच माध्यमांमधून आपल्या अभिनयाचा ठसा उमटवत वाहवाह मिळवली आहे. मात्र मागील काही महिन्यांपासून ती अनेकदा विविध बड्या नेत्यांसोबत दिसली. त्यामुळे साहजिकच प्राजक्ता राजकारणात जाणार अशा चर्चा होऊ लागल्या. मात्र आता खुद्द प्राजक्तानेच यावर उत्तर दिले आहे.

एका मुलाखतीमध्ये प्राजक्ताने तिच्या राजकीय प्रवेशाबद्दल म्हटले, “तुम्ही पावरफुल लोकांच्या संपर्कात राहायला पाहिजे, किंवा तुम्ही स्वत: तेवढेच पावरफुल व्हायला पाहिजे. मी खूपच भावनिक आहे. त्यामुळे राजकारणात प्रवेश करण्याचा माझा विचार नाहीये. मला जमणारही नाही. मात्र मी भविष्यात काय होईल हे काही सांगू शकत नाही. पण सध्यातरी असा कोणताही माझा विचार नाही.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Prajaktta Mali (@prajakta_official)


हे ही वाचा

“‘ॲनिमल’सारखे सिनेमे यशस्वी होणे चिंताजनक” जावेद अख्तर यांचं मोठं विधान

“दादा मला वाचवा” म्हणत सुरेश वाडकर यांनी अजित पवारांना केले ‘हे’ आवाहन

“८०-८५ वर्षाच्या लोकांनी आशीर्वाद देण्याचे काम करावे”, अजित पवारांचा शरद पवारांना नाव न घेता सल्ला

प्राजक्ताच्या राजकारणातील प्रवेशाच्या चर्चा होण्याचे कारण म्हणजे, ती काही महिन्यांपूर्वी प्राजक्ता दसऱ्याचे औचित्य साधत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विजयादशमी सोहळ्यासाठी गेली होती. त्यानंतर ती भाजपच्या काही मोठ्या नेत्यांना देखील भेटली होती. यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार या नेत्यांची भेट घेतल्यानंतर तिच्या भाजप प्रवेशाबद्दलही चर्चांना उधाण आलं होतं. पण आता तिनं या भेटीचा उद्देशही सांगितला आहे. प्राजक्ता म्हणाली की, राजकारणात यायचं असं काही नाही, पण अशा मोठ्या लोकांच्या भेटी घ्यायला हव्यात. मी त्यांच्याच कार्यक्रामला गेले होते, तेव्हा त्यांची भेट झाली. तसंच भविष्यात मला बऱ्याच गोष्टी करायच्या आहेत. यांचा समावेश होता. ती म्हणते अशा मोठ्या लोकांच्या भेटी घेत ओळख ठेवली पाहिजे. त्यांची ओळख कधी तरी कामी येऊ शकते.

प्राजक्ता माळीने काही महिन्यांपूर्वी तिचा ‘प्राजक्ताप्रभा’ कविता संग्रह प्रकाशित केला होता. त्यानंतर तिने ‘प्राजक्तराज’ नावाचा पारंपरिक दागिन्यांचा ब्रँड सुरू केला. सोबतच ती विविध प्रोजेक्ट्समध्ये देखील अभिनय करताना दिसत आहे. महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमाचे खुमासदार सूत्रसंचालन देखील ती करते.

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी