27 C
Mumbai
Saturday, March 2, 2024
Homeराजकीयअंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या मालत्तेच्या लिलावात 'कशाची' बोली?

अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या मालत्तेच्या लिलावात ‘कशाची’ बोली?

अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम हा जागातील सर्वाधिक श्रीमंत गॅंगस्टर आहे. १९५३ च्या साखळी बॉम्ब स्फोटमध्ये दाऊदचे नाव आहे. अनेकदा दाऊद इब्राहिमला (dawood Ibrahim) पकडण्याचा प्रयत्न केला मात्र तो अजूनही कचाट्यात सापडला नाही. गेली अनेक वर्षांपासून तो सध्या पाकिस्तानमध्ये असल्याच्या चर्चा आहेत. दाऊद इब्राहिम सध्या काय करतो? कुठे असतो? याबाबत अजूनही ठोस माहिती कोणालाच नाही. तरीही दाऊद चर्चेत आहे. सध्या तो त्याच्या मुंबई आणि रत्नागिरीच्या मालमत्तेमुळे चर्चेत आहे. दाऊद हा मुळचा रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील आहे. या ठिकाणी त्याची आई अमिना बी हिच्या नावावर चार मालमत्ता आहेत.

दाऊदच्या आईच्या नावावर चार मालमत्ता आहेत. त्यातील दोन मालमत्तांचा लिलाव झाला आहे. मात्र इतर दोन मालमत्तांचा लिलाव झाला नसल्याची माहिती समोर आली आहे. एक मालमत्ता २.१ तर दुसरी मालमत्ता ३.२८ लाखांपर्यंत बोली लावण्यात आली आहे. ही बोली आयकर विभागामध्ये (income tax office) आज लावण्यात आली आहे. खेड तालुक्यामध्ये जी जमिन होती त्या जमिनीचा आजच लिलाव झाला. त्यामध्ये दाऊदच्या घराचा देखील समावेश आहे. याचा लिलाव हा १९ लाखांपर्यंत गेला आहे.

हे ही वाचा

‘मी फक्त ढकललं मारलं नाही’

‘शरद मोहोळला त्याच्या जवळच्या साथीदारानं मारलं’, देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य

कुख्यात गुंड शरद मोहोळवर गोळीबार, पुण्यात मुळशी पॅटर्न

२०२० साली दाऊच्या मालमत्तेचा लिलाव

२०२० साली दाऊदच्या मालमत्तेचा लिलाव करण्यात आला होता. यावेळी दाऊदने रत्नागिरीतील खेड येथील लोटे गावातील संपत्तीचा लिलाव करण्यात आला होता. त्यावेळी बंद पडलेला पेट्रोपंप आणि एक फ्लॅटचा १.१० कोटींच्या घरामध्ये लिलाव करण्यात आला होता.

जगातील सर्वात श्रीमंत गॅंगस्टर

दाऊद इब्राहिम हा जगातील सर्वाधिक श्रीमंत गॅंगस्टर आहे. तो सध्या पाकिस्तानला असल्याच्या चर्चा असून त्याचे विविध देशांमध्ये मोठमोठे काळे धंदे आहेत. त्याने अनेक मार्गाने काळा धंदा केला आहे आणि अजूनही सुरू आहे. फोर्ब्ज या मासिकाने दिलेल्या वृत्तानुसार दाऊदची २०१५ मध्ये ६.७ मिलीयन डॉलर्स इतकी मालमत्ता होती. आता ती त्याहूनही अधिक असल्याचं बोललं जातंय.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी