24 C
Mumbai
Sunday, March 3, 2024
Homeराजकीयबारामती मतदारसंघात अजित पवारांचा उमेद्वार की सुप्रिया सुळे? बारामतीकर कन्फ्यूज

बारामती मतदारसंघात अजित पवारांचा उमेद्वार की सुप्रिया सुळे? बारामतीकर कन्फ्यूज

तेलंगणा, छत्तीसगड, मध्यप्रदेश, राजस्थान राज्याच्या विधानसभा निवडणुकीत भाजपने तीन राज्यात मोठ्या फरकाने विजय मिळवला आहे. अशातच आता महाराष्ट्र राज्याच्या लोकसभा निवडणुकांकडं भाजपचं लक्ष लागलं आहे. महाराष्ट्रात मुंबई सारखी आर्थिक राजधानी आहे. तर पश्चिम महाराष्ट्रात राष्ट्रवादी शरद पवार गटाचं (sharad Pawar) पारडं जड आहे. पश्चिम महाराष्ट्रात बारामती मतदारसंघ हा शरद पवारांचा बालेकिल्ला आहे. हाच बालेकिल्ला मिळवण्यासाठी गत निवडणुकीत देवेंद्र फडणवीसांनी बारामतीतून अनेक बाजूंनी ताकद लावली होती, मात्र उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit pawar) आणि सुप्रिया सुळेंनी (supriya sule) बारामती मतदारसंघात (Baramati Assembly Election) आपले वर्चस्व प्रस्थापित केलं. मात्र आता आगामी लोकसभा निवडणूक पाहता राष्ट्रवादीत फूट पडली आहे. यामुळे आता अजित पवार हे सुप्रिया सुळेंविरोधात कोणता उमेद्वार उभा करतील? आणि वर्चस्व कोणाचं राहील? याबाबत माध्यमांनी बारामतीतील काही मतदारांच्या प्रतिक्रिया घेतल्या आहेत.

‘एबीपी माझा’ने बारामतीतील मतदारांशी संवाद साधला आहे. यावेळी अनेक मतदारांनी प्रश्नांची उत्तरं दिली आहेत. राष्ट्रवादी शरद पवार गट आणि अजित पवार गट असे दोन गट पडले आहेत. दोन्ही गटातून एकमेकांवर टीका केल्या जात आहेत. तर दुसऱ्या बाजूला न्यायालयात पक्ष आणि चिन्ह कोणाचं? यावरूनही खडाजंगी पाहायला मिळत आहे.

दरम्यान, लोकसभेला आता अजित पवारांनी महाराष्ट्रातील चार जागांवर निवडणूक लढवणार असल्याची माहिती दिली आहे. सुप्रिया सुळे या बारामती मतदारसंघातून लोकसभा निवडणार आहेत, तर त्यांच्या विरोधात अजित पवार कोणाला उभं करणार याबाबत चर्चा आहेत. बारामतीत काही मतदारांनी याबाबत सांगितलं आहे.

हे ही वाचा

‘मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देणं शक्य नाही’

‘राजेश टोपेंच्या गाडीवर केलेला हल्ला म्हणजे भाजपचा रडीचा डाव’

बारामतीत सुप्रिया सुळेंविरोधात सुनेत्रा पवार की आणखी कोण?

बारामती मतदारसंघातून अजित पवारांचा उमेद्वार की सुप्रिया सुळे येणार निवडून?

बारामतीकरांना सुप्रिया सुळे निवडून येतील की अजित पवारंचा उमेद्वार निवडून येईल असा प्रश्न विचारला असता, कहींनी अजित पवारांचे नाव घेत दादांचा उमेद्वार निवडून येईल, असे उत्तर दिलं आहे. तर काहींनी सुप्रिया सुळे निवडून येतील,असे मत व्यक्त केलं आहे. तर काही लोकांनी याबाबत काहीच सांगता येत नसल्याचं सांगितलं आहे. अनेकांनी अजित पवारांचं काम हे चांगलं असून त्यांचा उमेद्वार निवडून येईल, असे देखील मत या ठिकाणी केलं गेलं आहे.

बारामतीकर कन्फ्यूज

काहींनी दोघांचंही काम बारामतीसाठी मोलाचं असल्याचं बारामतीकरांनी सांगितलं आहे. काही बारामतीतील मतदारांनी याबाबत कोणतंही अक्षर काढलं नाही, याबाबत न बोललेलंच बरं असं मत व्यक्त केलं आहे. बारामतीकर पूर्णपणे कन्फ्यूज आहेत, अशी काही मतं बारामतीतील मतदारांनी एबीपी माझाशी संवाद साधताना दिली आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी