34 C
Mumbai
Wednesday, February 28, 2024
Homeमनोरंजनअॅनिमल चित्रपटाच्या वादाची राजकीय वर्तुळात चर्चा; खासदारांची मुलगी ढसाढसा रडू लागली

अॅनिमल चित्रपटाच्या वादाची राजकीय वर्तुळात चर्चा; खासदारांची मुलगी ढसाढसा रडू लागली

राज्यात आणि देशाच्या राजकारणात कधी काय घडेल आणि कधी काय बिघडेल हे सांगता येत नाही. आता हा वाद थेट संसदेत पोहचला आहे. १ डिसेंबर दिवशी अॅनिमल सिनेमा प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई करत असून तरुण या सिनेमाला प्रचंड गर्दी करत आहेत. या चित्रपटात रणवीर सिंग, अनिल कपूर, बॉबी देओल, रश्मिका मंदानासारख्या स्टारकास्टने काम केलं आहे. हा चित्रपट अठरा वर्षे वयोगटावरील मुलांसाठी आहे. संदिप रेड्डी वांगा यांनी या सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे. या सिनेमात वायलन्स अधिक असल्याचं जाणवतं. कॉंग्रेसच्या खासदार रंजीत रंजन यांच्या मुलीनं हा सिनेमा पाहिला आणि ती रडू लागल्याने रंजन यांनी यावर भाष्य केलं आहे.

काय म्हणाल्या रंजीत रंजन?

अॅनिमल सिनेमाबाबत बोलत असताना रंजीत रंजन म्हणाल्या की, सिनेमा हा समाजाचा आरसा असतो. आम्हीही लहानपणापासून सिनेमा पाहत आलो आहोत. मात्र आता जे चित्रपट येत आहेत ते येणाऱ्या तरुणाईवर गंभीर परिणाम करत आहेत. कबीर सिंग, अॅनिमल, पुष्पासारख्या चित्रपटामधून तरुणाईला काय शिकायला मिळालं?. माझ्या मुलीच्या महाविद्यालयात अनेक मुली आहेत. चित्रपट पाहताना माझ्या मुलीला रडू कोसळलं आहे. आणि ती चित्रपट पाहताना मधूनच उठून गेली आहे. चित्रपटात महिलांचा विनयभंग दाखवण्यात आला आहे. चित्रपटात हिंसा मोठ्या प्रमाणात असल्याने तिला पटलं नाही, असे आपले मत रंजीत रंजन यांनी व्यक्त केलं आहे.

हे ही वाचा

महुआ मोईत्रांची खासदारकी रद्द

शाळेच्या परिसरात तंबाखूजन्य वस्तूंची विक्री बंद?

नवाब मलिकांची कोंडी; सुनिल तटकरेंचा मलिकांबाबत गौप्यस्फोट

अॅनिमल हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत आहे. त्याने गुरूवार म्हणजेच (७ डिसेंबर) दिवशी २५ कोटी कमाई केली आहे. ही आकडेवारी अंदाजे असून जगभराचा विचार केल्यास ५०० कोटींचा टप्पा पार केला आहे. मुलगा आणि वडिलांच्या नात्यातील गुंतागुंतीची गोष्ट असून या चित्रपटातील सर्वच कलाकार आपल्या भूमिकेत छाप सोडत आहेत. या चित्रपटाच्या निर्मितीचा खर्च हा १०० कोटी आहे. पहिल्या दोन दिवसातच निर्मितीचा खर्च वसूल झाला आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी