29 C
Mumbai
Monday, February 26, 2024
Homeमनोरंजनमलायका आणि अर्जुनचं पुन्हा ब्रेकअप?

मलायका आणि अर्जुनचं पुन्हा ब्रेकअप?

गेल्या सहा वर्षांपासून लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये असलेले अभिनेत्री आणि मॉडेल मलायका अरोरा आणि अभिनेता अर्जुन कपूर पुन्हा चर्चेत आले आहे. दोघांमध्ये आता पुन्हा ब्रेक-अप झाल्याच्या चर्चा आहेत. यंदाच्या वर्षात अर्जुन आणि मलायका मध्ये नेमकं किती वेळा ब्रेकअप झालं, असा विनोदी प्रश्न आता सोशल मीडियावर विचारला जात आहे. आपल्या मोबाईलवरील स्क्रीनवर मलायकाचा फोटो हटवत अर्जुननं आपल्या आईचा फोटो ठेवल्यानं दोघांचं पुन्हा बिनसल्याची चर्चा सुरु झाली आहे.

अभिनेता अरबाज खानला घटस्फोट दिल्यानंतर 2017 साली अर्जुन कपूर आणि मलायकाचं अफेअर सुरू झालं. मलायका अरबाज खान सोबत विवाहित असतानाही दोघांचं अफेअर असल्याची चर्चा होती. त्यावेळी मलायकानं याबाबत मीडियाकर्मींनी खोटी अफवा पसरवल्याचं सांगितलं. अरबाजसोबत घटस्फोटानंतर मलायका आणि अर्जुन कपूर सार्वजनिक ठिकाणी एकत्र दिसू लागले. दोघंही एकमेकांचा हात पकडत हॉटेलमधून बाहेर पडताना फोटोग्राफर्सनी पाहिले. आपण मला एकाच्या प्रेमात असल्याची जाहीर कबुली अर्जुननं दिली. दोघंही परदेशात एकत्र सुट्ट्या घालवताना दिसून येतात.

 

View this post on Instagram

 

A post shared by Arjun Kapoor (@arjunkapoor)


सहा वर्ष लिव्हइनमध्ये राहणाऱ्या या क्युट कपलमध्ये वर्षाच्या सुरुवातीपासूनच मोठी भांडणं होत असल्याच्या चर्चा आहेत. अरबाज चित्रपटातील करिअर फ्लॉप ठरल्यानं मलायकांना लग्नाच्या अठरा वर्षानंतर त्याला घटस्फोट दिला. गेल्या अकरा वर्षापासून अर्जुनचा हिंदी सिनेमासृष्टीत स्ट्रगल सुरू आहे. अर्जुनचं करिअरही फ्लॉप ठरल्यानं दोघांमध्ये टोकाचे वाद होत असल्याची चर्चा आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Malaika Arora (@malaikaaroraofficial)


नुकताच अर्जुनचा मुंबई विमानतळावरचा एक व्हिडिओ समोर आला आहे. फोटोग्राफरने अर्जुन कपूरचा फोटो आणि व्हिडिओ काढत असताना अर्जुन कपूरच्या मोबाईल स्क्रीनवर झूम केलं. अर्जुनच्या मोबाईलवर त्याचा किंवा मलायकाचा फोटो असेल असं सर्वांना वाटलं होतं. अर्जुनच्या मोबाईलवर आई मोना शेवरी कपूर यांचा फोटो दिसल्यानंतर फोटोग्राफरही आश्चर्यचकित झाले. अर्जुनच्या मोबाईल स्क्रीनवर बरेचदा मलायकाचा फोटो असतो. अर्जुन आपल्या आईच्या खूपच जवळ होता. अर्जुननं हिंदीसिनेमासृष्टीत पदार्पणापूर्वीच आईला गमावलं. आता मलायकाकाही त्याच्यासोबत नाहीये. अर्जुनला आईची आठवण येत असल्यानं त्यानं मोबाईल स्क्रीनवर मोना शेवरी कपूर यांचा फोटो ठेवल्याचं बोललं जातंय.

हे ही वाचा 

पिक्चर सलमानचा चर्चा इम्रान हाश्मीची!

लग्नानंतर पहिल्यांदाच लॅक्मे फॅशन वीकमध्ये परिणीती साडीत अवतरली!

आली रे आली ‘सिंघम अगेन’ची हिरोइन आली!

अर्जुन नुकताच एका सौंदर्यप्रसाधनाच्या एप्लीकेशनच्या उद्घाटनाच्या वेळी प्रसारमाध्यमांसमोर आला होता. एप्लीकेशनच्या उद्घाटनाचं अँकरिंग अर्जुननं केलं होतं. अर्जुनकडे सध्या फारसे चित्रपट नाहीत. एका मागोमाग एक चित्रपट फ्लॉप होत असल्यानं अर्जुन बराच काळ घरीच असतो. त्यानं पार्टीलाही जाणं सोडलं आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी