27 C
Mumbai
Saturday, July 27, 2024
Homeराजकीयरवींद्र चव्हाण यांच्यानंतर डोंबिवली विधानसभेसाठी कोणाचे नाव चर्चेत?

रवींद्र चव्हाण यांच्यानंतर डोंबिवली विधानसभेसाठी कोणाचे नाव चर्चेत?

रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघासाठी भाजपकडून सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांचे नाव चर्चेत असताना चव्हाण यांचे उत्तराधिकारी म्हणून कोण आहे याची जोरदार चर्चा सुरू आहे. भाजपच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार मंदार हळबे यांचे नाव चर्चेत आहे. 2019 च्या डोंबिवली विधानसभा निवडणुकीत भाजपचे रवींद्र चव्हाण 86 हजार 227 मते मिळवून विजयी झाले. त्यांचे विरोधक आणि मनसेचे उमेदवार मंदार हळबे यांना 44 हजार 916 मते मिळाली होती. या निवडणुकीनंतर हळबे हे भाजपात आले आहेत. त्यांना व्यक्तिश: मानणारा वर्ग आहे. शिवाय भाजपात त्यांचे वजन आहे.

2009, 2014 और 2019 असे तीनदा रवींद्र चव्हाण आमदार झालेले आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या गुडबुकमधील एक आमदार म्हणून त्यांना ओळखले जाते. त्यामुळेच की काय सांस्कृतिक उपराजधानी असणाऱ्या डोंबिवलीचे नाव राज्यात चमकत राहावे यासाठी त्यांना सार्वजनिक बांधकाम या महत्वाच्या खात्याचे मंत्रिपद देण्यात आले आहे. शिवाय ते सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालक मंत्रीही आहेत.

निलेश राणे २००९ मध्ये खासदार होते. त्यानंतर सलग दोन वेळा ते खासदारकीच्या निवडणुकीत पराभूत झाले. आता २०२४ साठी त्यांना आमदारकीचे तिकीट देण्याची चर्चा सुरू आहे. तर लोकसभेसाठी रविंद्र चव्हाण यांच्या नावाची चर्चा यापूर्वीच सुरू झाली आहे. रविंद्र चव्हाण हे सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री असून ते भाजपचे आमदार आहेत. शिवाय ते सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. नारायण राणे यांना मानणारे सिंधुदुर्गात मतदार आहेत. त्यामुळेच राणे राज्यात मंत्री असताना त्यांचे मोठे चिरंजीव निलेश राणे २००९ मध्ये खासदार होते.

त्यानंतर सिंधुदुर्ग मधले राजकारण बदलले. नारायण राणे अँड कंपनी विरोधात शिवसेना, भाजपा आणि अन्य उमेदवार एकत्र आले.  यात एकदा राणे आपल्या मतदारसंघातून पराभूत झाले. त्यानंतर त्यांनी बांद्रा विधानसभा मतदार संघातून नशीब अजमावले. पण तिथेही ते पराभूत झाले. त्यानंतर त्यांनी निवडणूक लढवली नाही. दरम्यानच्या काळात पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले. २००९ नंतर निलेश राणे दोनदा लोकसभा निवडणुकीत पराभूत झाले.

यंदा खासदारकीसाठी रवींद्र चव्हाण यांचे नाव चर्चेत आहे. चव्हाण हे भाजपकडून उमेदवार असणार असल्याने त्यांचा प्रचार राणे कुटुंबाला करावाच लागणार आहे. शिवसेनेचे विनायक राऊत हे रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे दोनदा खासदार झाले आहेत. या मतदारसंघातून खासदार राऊत यांना हॅट्ट्रिक साधण्यासाठी मोठे कष्ट घ्यावे लागणार आहे. विनायक राऊत रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघातून दोनवेळा निवडून गेले.

२०१४ मध्ये त्यांना मोदी लाटेचा फायदा झाला. २०१९ मध्येही त्यांनी दणदणीत विजयी मिळवला. २०२४ मध्ये सलग तिसऱ्यांदा निवडून येण्यासाठी त्यांची मोर्चेबांधणी सुरू होती. राज्यात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीची महाविकास आघाडी स्थापन झाल्यानंतर खासदार राऊत यांचा विजय सहज मानला जात होता. पण आता शिवसेना आणि राष्ट्रवादीत फूट पडली आहे. त्यामुळे महाविकास आघाडीच्या मतांचे ध्रुवीकरण होणार आहे. ते रवींद्र चव्हाण यांना फायद्याचे ठरणार आहे.

हे सुद्धा वाचा
पिक्चर सलमानचा चर्चा इम्रान हाश्मीची!
गोपीचंद पडळकर स्वत:च्याच सरकारवर नाराज, उपोषणाची केली घोषणा
निलेश राणे यांनी घेतला राजकीय संन्यास !
रवींद्र चव्हाण खासदार झाल्यावर त्यांच्यानंतर डोंबिवली विधानसभा मतदार संघाचा आमदार कोण अशी चर्चा डोंबिवलीत सुरू झाली आहे. ही चर्चा मंदार हळबे यांच्या नावाशी येऊन थांबत आहे. 2019 मध्ये मनसेकडून उमेदवारी मिळालेल्या हळबे यांना मानणारे त्यांच्या पक्षात भरपूर कार्यकर्ते आहेत. दुसऱ्या पक्षात त्यांचा वावर असल्याने तेच डोंबिबली विधानसभा मतदार संघाचे आमदार होऊ शकतात, असे बोलले जाते.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी