26 C
Mumbai
Sunday, September 8, 2024
Homeमनोरंजनमी अम्मा होता, होता राहिले; गिरीजा ओकने सांगितला 'तो' किस्सा !

मी अम्मा होता, होता राहिले; गिरीजा ओकने सांगितला ‘तो’ किस्सा !

जवान चित्रपटाच्या घवघवीत यशानंतर आरोपी महिलांची भूमिका साकारणाऱ्या सहा अभिनेत्री एका रात्रीत प्रकाश झोतात आल्या आहेत. या सहा अभिनेत्रींमध्ये मराठमोळी गिरीजा ओक-गोडबोलेनं आपल्या भूमिकेविषयी मोठा उलगडा केला आहे. इश्कारा या महिला कैद्याच्या भूमिकेऐवजी मी आझाद राठोडची कावेरी अम्मा होता होता राहिले, असं गिरीजानं हसत सांगितलं.

गिरीजाला ऑडीशनच्यावेळी दक्षिणात्य दिग्दर्शक अॅटली चित्रपटाचं दिग्दर्शन करणार आहेत एवढीच मर्यादित माहिती होती. कुणी ए लिस्टेड अभिनेता चित्रपटात आहे असं कास्टिंग दिग्दर्शक मुकेश छाब्रिया यांनी मला सांगितलं. मुकेश आणि अॅटली यांना माझं ऑडिशन आवडलं. सिनेमात अभिनेत्री रिद्धी डोग्रानं शाहरुखच्या कावेरी अम्माची भूमिका निभावली आहे, ती भूमिका मुळात मी साकारणार होते, असं गिरीजा म्हणाली.

आपल्या भूमिकेविषयी बोलताना गिरीजा म्हणाली की, अटली यांना माझं ऑडिशन फारच आवडल्यानं त्यांनी मला पुन्हा भेटायला बोलावलं. मला तुझ्यासाठी वेगळी भूमिका तयार करायची आहे. सध्या मी तुझ्या भूमिकेबाबत लिहिलेलं नाही. तुला माझ्यावर विश्वास असेल तर थोड्या दिवसांत मी तुझ्यासाठी नक्कीच चांगलं पात्र तयार करेन असं अटलीनं मला सांगितलं. मी अटली यांचे सर्व दक्षिणात्य चित्रपट पाहिले होते. त्यांच्या कामाविषयी कल्पना असल्यानं मी त्वरित होकार दिला अन् मला इश्कारा मिळाली असं आनंदानं गिरीजा म्हणाली.

हे सुद्धा वाचा 
“हे तर येड्याचे सरकार!” मंत्रीमंडळ बैठकीवर कोट्यवधींच्या उधळपट्टीवरुन नाना पटोलेंचा घणाघात..
वंचितच्या प्रवक्त्यांना मीडियापासून ‘वंचित’ ठेवण्याचे कारस्थान; प्रकाश आंबेडकरांचा हल्लाबोल
काळवंडलेले गुडघे, कोपरांमुळे अनकंफर्टेबल वाटते; घरगुती उपायांमुळे दिसेल फरक

गिरीजानं जवान सिनेमात स्टंट सीन्स दिले आहेत. यामुळे बिनधास्त डेशिंग इश्काराचं सर्वांकडून कौतुक होत आहे. सहापैकी सानिया मल्होत्रा, प्रियमणी आणि लेहेर खानच्या पात्राची कहाणी दाखवण्यात आली आहे. गिरीजाची कहाणी न दाखवण्याबाबत मात्र गिरीजानं स्मितहास्य देत बोलणं टाळलं. कदाचित जवानच्या दुसऱ्या भागात इश्कराची कहाणी पाहायला मिळेल, असं तिनं मिश्किलीनं सांगितलं.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी