33 C
Mumbai
Monday, May 20, 2024
Homeराजकीय'देवेंद्र फडणवीस म्हणजे शूर्पणखा आम्ही शूर्पणखेचं नाक कापल्याशिवाय शांत बसणार नाही'

‘देवेंद्र फडणवीस म्हणजे शूर्पणखा आम्ही शूर्पणखेचं नाक कापल्याशिवाय शांत बसणार नाही’

आगामी लोकसभा निवडणुकीमुळे राजकीय पक्षातील नेते एकमेकांवर सतत टीका टिप्पणी करताना दिसत आहेत. अशातच आता सध्या देशामध्ये राम मंदिराने सर्वांचं लक्ष वेधलं आहे. राम मंदिराचा राजकारणासाठी वापर होत असल्याचं विरोधकांचं म्हणणं आहे. अशातच आता शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी रामायणाचा संदर्भ देत ‘उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra fadanvis) हे शूर्पणखा आहे आणि शूर्पणखेचं आम्हीच नाक कापणार’, असल्याचं राऊत म्हणाले आहेत. असं ते मुंबईतील पत्रकरांशी बोलताना दिसत होते. यानंतर ‘खरी शिवसेना ही वाघांची आहे. कधी आपण कोण आला रे कोण आला? भाजपचा वाघ आला असं ऐकलंय का? कारण शिवसेना वाघांची आहे,’ असं राऊतांनी म्हटलं आहे. (Ram temple Aayodhya)

आयोध्येच्या राम मंदिराच्या ठिकाणी याआधी बाबरी मशीद होती. मात्र ती अनेक वर्षांआधी पाडण्यात आली. यामध्ये अनेक नेते मंडळींनी आपला हातभार लावला होता. राज्यातील एकमेव नेते म्हणजे शिवसेना संस्थापक बाळासाहेब ठाकरे आहेत. त्यांनी बाबरी मशीदीचे अनेक आरोप आपल्या स्वत:वर घेतले. देवेंद्र फडणवीस आणि त्यांचे चेलेचपाटे एक नंबरचे खोटारडे आहेत,’ असं म्हणत राऊतांनी फडणवीसांवर टीकेची तोफ डागली आहे.

हे ही वाचा

टीम इंडियाचा रिंकू नंबर वन फिनिशर होण्यामागे धोनीचा हात

‘जास्त दिवस घोंगडं भिजवत ठेवलं तर त्याचा वास येणारच’

तरूणाची पुणे ते आयोध्या सायकलवारी

‘चारही शंकराचार्यांनी राम मंदिराच्या उद्घाटनासाठी येण्यावर बहिष्कार’

राम मंदिराच्या उद्घाटनासाठी आता मात्र चार शंकराचार्यांनी येण्यावर बहिष्कार टाकला आहे. देशातील सर्वात मोठे शंकराचार्य हे नरेंद्र मोदी आहेत, असं भाजपला वाटतंय का? श्रीरामाच्या प्राणप्रतिष्ठेवर चारही शंकराचार्यांनी राम मंदिराच्या उद्घाटनासाठी येण्यावर बहिष्कार टाकला आहे.

‘मोदींचा वेळ मिळत नाही म्हणून उद्घाटन रोखून ठेवलं’

राऊत यांनी उद्घाटनाबाबत बोलताना पुन्हा एकदा सरकारवर निशाणा साधला आहे. आदित्य ठाकरे अनेकदा बोलले आहेत की, एखाद्या प्रकल्पाचं उद्घाटन होणं गरजेचं आहे. ठाकरे सरकारच्या काळामध्ये एमटीएचएलला गती मिळाली. तो असा रोखून ठेवणं चूकच आहे. मोदींचा वेळ मिळत नाही म्हणून उद्घाटन रोखून ठेवता’.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी