30 C
Mumbai
Thursday, May 9, 2024
Homeक्रीडाटीम इंडियाचा रिंकू नंबर वन फिनिशर होण्यामागे धोनीचा हात

टीम इंडियाचा रिंकू नंबर वन फिनिशर होण्यामागे धोनीचा हात

काही महिन्यांआधी इंडिया विरूद्ध ऑस्ट्रेलिया असा टी 20 सामना खेळवण्यात आला होता. यावेळी रिंकूने षटकार ठोकत आपले इरादे स्पष्ट करून दाखवले आहेत. रिंकूला (Rinku singh) सध्या नवखा फिनिशर म्हणून संबोधलं जातं. अशातच आता ११ जानेवारी मोहाली येथे धर्मशाला स्टेडिअमवर इंडिया विरूद्ध अफगाणिस्तान ( India vs Afganistan) असा पहिला टी 20 मालिकेतील सामना झाला आहे. या समान्यामध्ये टीम इंडियाने दमदार विजय मिळवला आहे. यासामन्यामध्ये सर्वात महत्त्वाचा इंडियाचा खेळाडू फिनिशर ठरला तो म्हणजे रिंकू सिंग. जितेश शर्मा बाद झाल्यानंतर रिंकूने ९ चेंडूमध्ये दोन चौकार लगावत १६ धावांची खेळी केली आहे. मोहालीमध्ये खेळल्या गेलेल्या या सामन्यामध्ये टीम इंडियाने अफगाणिस्तानचा ६ विकेट्सने पराभव केला होता.

फिनिशर म्हणून रिंकूची नवी ओळख

रिंकून ऑस्ट्रेलियाविरूद्ध टी 20 सामन्याच विजयी चौकार मारत सामन्याला कलाटणी दिली. त्यामुळे रिंकू हा गेम फिनिशर म्हणून चर्चेत आहे. अशातच अफगाणिस्तानच्या सामन्यातही रिंकू गेम चेंजर ठरला आहे. तो गेम फिनिशर म्हणून ओळखला जात आहे. यावर सामना संपल्यानंतर त्याने यामागील गैप्य सांगितलं आहे.

हे ही वाचा

‘जास्त दिवस घोंगडं भिजवत ठेवलं तर त्याचा वास येणारच’

डंकी सिनेमा ऑस्करच्या शर्यतीत?

वसिम अक्रमच्या पत्नीला एका चाहत्याने हॉट अशी केली कमेंट, अक्रमचा पारा चढला

६ व्या क्रमांकावर येऊन मला सामना संपवण्याची मला सवय झाली आहे. यामध्ये मी खूपच आनंदी आहे. मोहालीला सध्या थंड वातावरण आहे. यावेळी त्याने थंडीचा अनुभव घेतला, मात्र क्षेत्ररक्षण करताना अवघड गेलं आहे. सहाव्या क्रमांकावर आल्यानंतर मला जास्त चेंडू खेळण्याची तसेच मोठी धावसंख्या खेळण्याची गरज नाही. त्यामुळे मी फक्त स्वत:शीच बोलत राहण्याचा प्रयत्न करतो. माही भाई (एम.एस.धोनी) शी बोललो आहे. त्यानं मला फक्त चेंडूनुसार खेळण्याचा सल्ला दिला आणि मी तेच करत असतो.

‘फलंदाजी करताना जास्त विचार करत नाही’

फलंदाजी करत असताना मी फार जास्त विचार करत नाही. मी फक्त चेंडूनुसार खेळतो. भारतासाठी डाव खेळणारा रिंकू आतापर्यंत केवळ एकदाच एका अंकी धावसंख्येत बाद झाला. तो आतापर्यंत पाच वेळा नाबाद रहिला आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी