28 C
Mumbai
Tuesday, November 28, 2023
घरमनोरंजन'जवान'ची कमाई एक हजार कोटींवर; विकेंडला शाहरुख खान कडून तिकीट दरात सवलत!

‘जवान’ची कमाई एक हजार कोटींवर; विकेंडला शाहरुख खान कडून तिकीट दरात सवलत!

शाहरुखच्या जवान चित्रपटाने आता एक हजार कोटी रुपयांपेक्षाही जास्त कमाई केली आहे. चित्रपटाच्या घवघवीत कमाईनंतर आता विकेंडला ऑनलाईन तिकीट खरेदीत एका तिकिटावर दुसरी तिकीट फ्री अशी घोषणा निर्माता आणि अभिनेता शाहरुख खाननं केलीये. बुक माय शो, पेटीएम मुव्हीज आणि पीव्हीआर आयनॉक्स आणि सिनेपोलीसवर तिकीट ऑनलाईन बुक केल्यास ही सवलत उपलब्ध होईल. खुद्द शाहरुखनेच याबाबतची घोषणा केली.

शाहरुख खानच्या रेड चिलीज एन्टरटेंटमेंटकडून ‘जवान’ चित्रपटाची निर्मिती करण्यात आली. प्रसिद्ध दक्षिणात्य दिग्दर्शक अटली यांनी ‘जवान’ चित्रपटाचं दिग्दर्शन केलंय. नयनतारानं ‘जवान’मधून हिंदी सिनेसृष्टीत पाऊल ठेवलं. तर विजय सेतूपतीनं नकारात्मक भूमिका साकारली. या चित्रपटात शाहरुखची दुहेरी भूमिका आहे. शाहरुखच्या विक्रम राठोडच्या पात्राला प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतलं. प्रेक्षकांच्या वाढत्या प्रतिसादाला दाद देत आता शनिवारपर्यंत ‘जवान’ चित्रपटाची तिकीट बुकिंग ऑनलाईन माध्यमातून बुक केल्यास एका तिकीट खरेदीवर दुसरे तिकीट फ्री अशी सुविधा उपलब्ध होईल.

हे सुद्धा वाचा 
कृषी विभागाच्या परीक्षेत कॉपीबहाद्दराची चलाखी, कॉपीसाठी एटीएमसारख्या डिव्हाईसचा वापर
भारतीय शेतकऱ्यांचे भाग्यविधाते हरित क्रांतीचे प्रणेते एस. स्वामीनाथन
आमदार अपात्रतेचा निकाल २०२४ मध्येच? विधानसभा अध्यक्षांकडून सुनावण्यांचे वेळापत्रक जाहीर

९० च्या दशकातील भारतीय सैनिक विक्रम राठोड बंदूक खरेदीतील गैरव्यवहार उघडकीस आणतो. शस्त्र व्यापारी आणि गुंड प्रवृत्तीच्या काली गायकवाडकडून विक्रमचा खून होतो. प्रत्यक्षात विक्रम राठोड वाचतो. विक्रम आणि मुलगा आझाद राठोड काली गायकवाडला धडा शिकवतात, अशी जवान चित्रपटाची कहाणी आहे. जवान चित्रपट ७ सप्टेंबर रोजी प्रदर्शित करण्यात आला. त्यावेळी ‘ड्रीम गर्ल’ चित्रपटाने आपला गाशा गुंडाळला, सध्या गेल्या आठवड्यात प्रदर्शित झालेल्या ‘सुखी’ आणि ‘द व्हेक्सीन वोर’ चित्रपट चर्चेत आहेत. शाहरुखच्या घोषणेमुळे या चित्रपटांनाही गाशा गुंडाळावा लागतोय की काय, अशी चर्चा आहे.

 

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी