अभिनेता रणबीर कपूरच्या वाढदिवसाच्या निमित्ताने अखेरीस ‘ऍनिमल’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला. रणबीर कपूरसह अभिनेत्री राश्मिका मदना, बॉबी देओल आणि अनिल कपूरची चित्रपटात महत्वाची भूमिका आहे. युट्युबवर तासाभरात ‘ऍनिमल’ चित्रपटाच्या ट्रेलरला ४० लाख प्रेक्षकांनी पसंती दिली. युट्युबवर ‘ऍनिमल’ चित्रपटाचा ट्रेलर २३ व्या क्रमांकावर ट्रॅन्डवर होता.
रणबीर कपूर आज ४१ वा वाढदिवस साजरा करतोय. दोन दिवसांपूर्वीच रणबीर कपूरच्या वाढदिवसाच्या दिवशी ‘ऍनिमल’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित केला जाईल, अशी ‘टी सिरीज’ निर्माता कंपनीने घोषणा केली होती. सिनेमा एका गुंडाच्या आयुष्याभोवती फिरतो. रणबीर कुख्यात आंतरराष्ट्रीय गुंडाची भूमिका साकारतोय. अनिल कपूर रणबीरच्या वडिलांच्या भूमिकेत आहेत तर राश्मिका मदनानं रणबीरच्या बायकोची भूमिका साकारलीये. तुला बाप व्हायचंय का? या राश्मिका आणि रणबीरच्या संवादानं ट्रेलरची सुरुवात होते. रणबीरही तिच्याकडे बाप होण्याची इच्छा व्यक्त करतो. तुझ्या वडिलांसारखं तुला व्हायचं नाहीये ना? या राश्मिकाच्या प्रश्नावर रणबीर चिडतो. या संवेदनशील संवादातच सिनेमाची सुरुवात होते.
हे सुद्धा वाचा
‘जवान’ची कमाई एक हजार कोटींवर; विकेंडला शाहरुख खान कडून तिकीट दरात सवलत!
कृषी विभागाच्या परीक्षेत कॉपीबहाद्दराची चलाखी, कॉपीसाठी एटीएमसारख्या डिव्हाईसचा वापर
भारतीय शेतकऱ्यांचे भाग्यविधाते हरित क्रांतीचे प्रणेते एस. स्वामीनाथन
सिनेमात रक्तपात, मारझोड, संवेदनशील दृश्ये आहेत. या चित्रपटातील काही दृश्याना सेन्सर बोर्डाकडून कात्री लागण्याची शक्यता आहे. सिनेमाला प्रौढ प्रमाणपत्र मिळण्याचीही दाट शक्यता वर्तवली जातेय. अर्जुन सिंग फेम संदीप रेड्डी यांनी ‘ऍनिमल’ चित्रपटाचं दिग्दर्शन केलंय. येत्या १ डिसेंबर रोजी ‘ऍनिमल’ चित्रपट प्रदर्शित होईल.