33 C
Mumbai
Monday, May 20, 2024
Homeमनोरंजनघाटकोपरच्या आयनोक्स थीएटरमध्ये 'जवान'चा शो बंद

घाटकोपरच्या आयनोक्स थीएटरमध्ये ‘जवान’चा शो बंद

अभिनेता शाहरुख खानच्या ‘आयनोक्स’ सिनेमात जवान सिनेमा अचानक बंद पडला. सिनेमा मध्यान्तरानंतर बराच वेळ सुरु झाला नाही, केवळ सिनेमातील संवाद स्क्रीनवर ऐकू येऊ लागले. प्रेक्षकांचा संताप अनावर होण्याअगोदरच सिनेमागृहाकडून तातडीने आवश्यक उपाययोजना करून सिनेमा सुरु करण्यात आला.

सकाळी ८.३५ च्या जवानच्या शोचे मध्यान्तर बरेच मिनिटे सुरु होते. दहा मिनिटांपेक्षा जास्त काळ स्क्रीनवर जाहिराती सुरु राहिल्या. सिनेमाचा दुसरा भाग कधी सुरु होईल याची प्रेक्षकांना प्रतीक्षा लागली. प्रत्यक्षात एकामागोमाग जाहिराती सुरु राहिल्या. रविवारी सिनेमागृहात इतर दिवसांच्या तुलनेत जास्त जाहिराती दाखवल्या जातात, असा प्रेक्षकांच्या एका गटातून सूर उमटला. एकच जाहिरात पुन्हा दिसू लागल्यानंतर प्रेक्षक संतापले. सिनेमागृहातील लाईट बंद केल्यानंतर आता पिक्चर सुरु केला जाईल, अशा भ्रमात प्रेक्षक असताना प्रत्यक्षात पुन्हा त्याच जाहिराती दाखवल्या गेल्या. प्रेक्षक ओरडू लागल्यानंतर जाहिराती बंद झाल्या. काहीवेळाने केवळ अभिनेत्री नयनतारा आणि लहान मुलीचे संवाद ऐकू आले. प्रेक्षकांनी तातडीने सिनेमा सुरु करण्याची मागणी उचलून धरली. सिनेमाचं प्रक्षेपण करणाऱ्या काचेच्या खिडकीच्या दिशेने प्रेक्षकांनी मोबाईल टॉर्च धरत जोराने ओरडायला सुरुवात केली. काहींनी सिनेमागृहाबाहेर जाण्याचा प्रयत्न केला.

अखेरीस सिनेमागृहात लाईट सुरु केले गेले. सिनेमा सुरु होत असून प्रेक्षकांनी आपापल्या आसनावर बसण्यासाठी लाईट लावल्याची चर्चा रंगली. या गोंधळात वीस मिनिटांहून अधिक वेळ गेल्यानंतर सिनेमा सुरु करण्यात आला. या प्रकरणी सिनेमागृहातील अधिकाऱ्यांनी जबाबदारी स्वीकारत प्रेक्षकांची माफी मागितली नाही. त्यामुळे प्रेक्षकांनी संताप व्यक्त केला. या संपूर्ण प्रकरणाची सिनेमाच्या निर्मात्यांनी दखल घ्यावी, अशी मागणी प्रेक्षकांनी केली.

हे ही वाचा 

अक्षय कुमार करणार एक्स गर्लफ्रेंड रविना टंडन आणि दिशा पटानी सोबत धमाल

गिरीजा ओकला बॉलीवुडमध्ये आले सुगीचे दिवस

भूमि पेडणेकरच्या थँक्यू फॉर कमिंग चित्रपटात मांडलेल्या ऑरगॅजम विषयाबाबत तुम्हाला माहिती आहे का?

तीन दिवसांत शाहरुखच्या ‘जवान’चित्रपटानं १८०.४५ कोटी रुपयांची कमाई केली आहे. शाहरुखच्या चित्रपटाची क्रेझ दिवसेंदिवस वाढतच आहे. सिनेमागृहात तांत्रिक बिघाड होत असल्यास तणाव निर्माण होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी