32 C
Mumbai
Monday, January 29, 2024
Homeमनोरंजन'जय श्रीराम, जय श्रीराम' नारा लावत कंगना राणाैत रामलल्लाच्या भक्तीत तल्लीन

‘जय श्रीराम, जय श्रीराम’ नारा लावत कंगना राणाैत रामलल्लाच्या भक्तीत तल्लीन

अवघ्या देशाचं स्वप्न आता सत्यात उतरलं आहे. गेली अनेक वर्षांपासून प्रभू श्रीरामाच्या प्राणप्रतिष्ठेसाठी अनेकांच्या नजरा लागल्या होत्या मात्र आता त्यावर शिक्कामोर्तब झाला आहे. राम मंदिराचा सोहळा येईपर्यंत अनेक ट्विस्ट आणि घटना घडल्या आहेत. यामुळे राम मंदिराच्या विषयाची चर्चा सर्वत्र होऊ लागली आहे. अशातच देशातील मनोरंजनसृष्टीतील कलाकार मंडळींनी आपली उपस्थिती दर्शवली आहे. तर देशातील क्रिकेट खेळाडूंना या राम मंदिराच्या सोहळ्याचं निमंत्रण देण्यात आलं. यामुळे काही वेळाआधी अभिनेता रणवीर कपूर आणि आलिया भट यांनी उपस्थिती दाखवली असून अभिनेता विकी कैशल आणि अभिनेत्री कतरीना कैफने देखील उपस्थिती दाखवली. अशातच आता बॉलिवूडची अभिनेत्री कंगना राणौत (kangana Ranaut) ही नेहमीच कोणत्या न् कोणत्या कारणांसाठी चर्चेत असते अशातच आता ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. (jay shree ram)

कंगना आयोध्यामध्ये काही वेळा पूर्वी दाखल झाली आहे. ती प्रभू श्रीरामाच्या चरणी नतमस्तक झाली आहे. यानंतर ती रामाच्या भक्तीमध्ये तल्लीन झाल्याचं दिसत आहे. अनेक दिवसांपासून रूपेरी पडद्यापासून दूर गेलेली कंगना रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेनिमित्त पुन्हा एकदा चाहत्यांच्या भेटीला आली आहे. तिनं आपला व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. रामलल्लाचा आशिर्वाद घेतला आहे. व्हिडीओमध्ये ती रामलल्लाचा जयघोष करत आहे.


हे ही वाचा

‘जय श्रीराम घोषणा देता कोणता पक्ष आणि नेते आचार विचारांचं पालन करतात?’

‘मी कोणता गुन्हा केला? मला मंदिरात जाऊ देत नाहीत’

‘आयोध्येत राजकीय स्टंट करण्यात भाजपचा हात धरू शकत नाही’

कंगना राणौतकडून रामलल्लाचा नारा

संपूर्ण देशाचं स्वप्न पूर्ण झालं आहे. अशातच आता रामलल्लाच्या उत्सवात केवळ भक्तगण नाहीतर आता कलाकार मंडळींचा उत्साह आता शिगेला गेला आहे. अशातच आता कंगना राणौत देखील भक्तीत तल्लीन झाली आहे. ‘जय श्रीराम जय श्रीराम’, असा नारा देत कंगनाचा आनंद गगणामध्ये मावेनासा दिसत आहे. व्हिडीओ पाहिल्यानंतर कळतं की कंगना अधिकच आनंदीत दिसत आहे. सर्वत्र गुलाबाच्या पाकळ्या पडत असल्याचं व्हिडीओमध्ये दिसत आहे. आपल्या ‘x’ (Tweeter) अकाऊंटवर कंगनानं व्हिडीओ शेअर केला आहे.

कंगनाची राजकीय वाटचाल?

काही दिवसांपासून कंगनाची पाऊलं ही राजकारणाकडे वाटचाल करत असताना दिसत आहे. यामुळे आता राम मंदिराच्या सोहळ्याला येण्यामागं कंगनाचा आगामी निवडणूक लढवण्याचा विचार आहे का? असा अनेकांना प्रश्न उपस्थित होत आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी