31 C
Mumbai
Saturday, May 18, 2024
Homeराजकीयमीरा रोड परिसरात सनातनवाद्यांवर झालेल्या हल्ल्यावरून फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया

मीरा रोड परिसरात सनातनवाद्यांवर झालेल्या हल्ल्यावरून फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया

देशामध्ये रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेमुळे काही दिवसांपासून उत्साहाचं वातावरण झालं आहे. मात्र प्राणप्रतिष्ठेच्या एका दिवसाआधी म्हणजेच २१ जानवारी दिवशी मीरा रोडवर सनातन वाद्यांच्या गाड्यांवर दगडफेक झाली आहे. यावेली गाड्यांच्या काचा फोडण्यात आल्या आहेत. तसेच गाड्यांना लावलेले झेंडे उतरवण्यात आले. तर व्हिडीओ पाहिल्यावर समजते की काही झेंडे फेकण्यात आले आहेत. तर अल्लाह हु अखबरचा नारा लावण्यात आला आहे. यामुळे आता तणावाचे वातावरण पाहायला मिळत आहे. सध्या सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ व्हायरल होताना दिसत आहेत. काही सीसीटीव्ही फुटेज हे पोलिसांच्या हातात सापडले आहेत. यावर आता गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी पहिली प्रतिक्रिया त्यांच्या ट्विटर ‘x’ अकाऊंटवरून दिली आहे.

कालपासून सोशल मीडियावर अनेक व्हायरल व्हिडीओ पसरत आहेत. मुंबईतील मीरा रोड येथे काही चारचाकी आणि काही दुचाकी गाड्यांवर दगडफेक केली असल्याची माहिती व्हिडीओ पाहिल्यास समोर येत आहे. यावेळी एका महिलेच्या डोक्याला जबर मार लागल्याचं पाहायला मिळालं. तर व्हिडीओमधून शिवीगाळ देखील करण्यात आली असल्याचं पाहायला मिळत आहे. याप्रकरणावर कसून चौकशी सुरू आहे. २१ जानेवारी रात्रीपासून पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

हे ही वाचा

जय श्रीराम, जय श्रीरामचा नारा लावत कंगना राणाैत रामलल्लाच्या भक्तीत तल्लीन

‘जय श्रीराम घोषणा देता कोणता पक्ष आणि नेते आचार विचारांचं पालन करतात?’

‘आयोध्येत राजकीय स्टंट करण्यात भाजपचा हात धरू शकत नाही’

‘अफवांवर विश्वास ठेवू नका’

मुंबईमध्ये झालेल्या मीरा रोड येथील वातावरण चांगलंच तापलं आहे. रात्री १२ च्या सुमारास सनातनवादी लोकांनी झेंडे लावून मार्चा काढला होता. यावेळी काही मुस्लिम तरूणांनी गाड्यांवर हल्ला केला आहे. तसेच ज्या ठिकाणी हल्ला करण्यात आला होता तो भाग मुस्लिमबहुल परिसर आहे. तर या परिसराच्या अवतीभोवतीच्या परिसरामध्ये गुजराती, मारवाडी आणि जैन समाज अधिक असल्याची माहिती समोर येत आहे. यावेळी पोलिस अधिकाऱ्यांनी परिस्थिती नियंत्रणामध्ये असल्याची माहिती दिली आहे. अशातच गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलिस अधिकाऱ्यांसोबत माहिती मिळवक कायदा-सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न केला तर खपवून घेतलं जाणार नसल्याची माहिती दिली.


काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

‘मीरा-भाईंदरमधील नयानगर भागात काल रात्री घडलेल्या प्रकाराची संपूर्ण माहिती काल रात्रीच घेतली आहे. सोमवारी पहाटे ३.३० वाजेपर्यंत मी मीरा-भाईंदर पोलिस आयुक्तांच्या सातत्याने संपर्कात होतो. आरोपींवर कठोर कारवाईचे निर्देश पोलिसांना देण्यात आले आहेत. या प्रकरणात आतापर्यंत १३ आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून, सीसीटीव्ही फुटेज तपासून अन्य आरोपी ओळखण्याची प्रक्रिया सुरु आहे. महाराष्ट्रात कायदा-सुव्यवस्था कुणी बिघडविण्याचा प्रयत्न करीत असेल तर ते खपवून घेतले जाणार नाही’, असं म्हणत फडणवीसांनी संताप व्यक्त केला

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी