देशामध्ये आयोध्येत रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेचा सोहळा सध्या सुरू आहे. देशामध्ये सध्या याच क्षणाची वाट पाहत असताना स्वप्न सत्यात उतरत आहे. अशातच या राम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्यासाठी अनेक देशातील आणि जगातील मान्यवर हजेरी लावणार आहेत. यामुळे आता आयोध्येला पावनभूमी म्हणून स्थान प्राप्त झालं आहे. राम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्याला अनेक राजकीय रंग प्राप्त झाले आहेत असा दावा विरोधी पक्ष नेते अनेक दिवसांपासून करत आहेत. यावरून आता विरोधी आणि सत्ताधारी यांच्यामध्ये अनेक दिवसांपासून जुंपली आहे. अशातच आता राष्ट्रवादी शरद पवार गटाचे कार्यकर्ते विकास लवांडे यांनी सत्ताधारी पक्षांवर रामलल्लाचे आचार विचार घेतले का? नुसतेच नारे लावायचे असं म्हणत टीका केली आहे.
रामलल्लाच्या प्राणप्रितिष्ठेचा सोहळा आयोध्येमध्ये सुरू असताना देशामध्ये राजकीय पातळीवर विविध घटना घडत असल्याचं पाहायला मिळत होतं. अशातच आज जिकडे तिकडे रामलल्लाच्या नावाचा नारा लावला जात आहे. राहुल गांधीच्या भारत जोडो यात्रेदरम्यान काही भाजपच्या कार्यकर्त्यांनी जय श्रीरामचे नारे लावले आहेत. यावेळी कॉंग्रेस नेते राहुल गांधींना अडवण्यात आल्याचा प्रकार घडला आहे. अशातच यावर विकास लावंडे यांनी सत्ताधाऱ्यांवर टीका केली आहे.
हे ही वाचा
‘मी कोणता गुन्हा केला? मला मंदिरात जाऊ देत नाहीत’
‘आयोध्येत राजकीय स्टंट करण्यात भाजपचा हात धरू शकत नाही’
सोमवारी उद्धव ठाकरेंची तोफ नाशिकमध्ये धडाडणार
काय म्हणाले विकास लवांडे?
काही भाजपच्या कार्यकर्त्यांनी राहुल गांधींवर जय श्रीरामचा नारा लावला आहे. यावर आता राष्ट्रवादी शरद पवार गटाचे कार्यकर्ते विकास लवांडे यांनी सत्ताधारी पक्षाला श्रीरामाचे नाव घेता पण कोणता आचार विचार घेतला? असा सवाल लवांडे यांनी केला आहे. ते म्हणाले की, ‘उठता बसता जय श्रीराम घोषणा देता तेव्हा त्यांच्या कोणत्या आचार विचारांचे तुमचा पक्ष आणि तुमचे नेते प्रत्यक्ष पालन करतात? सत्यवचन, एकवचन, मानवता, सत्य, दया,क्षमा, संयम, प्रेम, त्याग, प्रामाणिकपणा,राजधर्म पालन यापैकी काय?’ असा सवाल आता विकास लवांडे यांनी सत्ताधाऱ्यांना केला आहे.
प्रश्न क्र.7 )
उठता बसता जय श्रीराम घोषणा देता तेव्हा त्यांच्या कोणत्या आचार विचारांचे तुमचा पक्ष व तुमचे नेते प्रत्यक्ष पालन करतात ?
सत्यवचन, एकवचन, मानवता, सत्य, दया,क्षमा, संयम, प्रेम, त्याग, प्रामाणिकपणा,राजधर्म पालन यापैकी काय ? #भाजपा_जवाब_दो@BJP4India @BJP4Maharashtra— Vikas Lawande (@VikasLawande1) January 22, 2024