32 C
Mumbai
Monday, January 29, 2024
Homeराजकीय'आयोध्येत राजकीय स्टंट करण्यात भाजपचा हात धरू शकत नाही'

‘आयोध्येत राजकीय स्टंट करण्यात भाजपचा हात धरू शकत नाही’

रामलल्लाची २२ जानेवारीला प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडणार आहे. आज देशभरातून अनेकांनी उपस्थिती लावली आहे. अशातच आता रामलल्लाच्या प्राणप्रितिष्ठेवरून राजकीय चर्चा होत आहे. काही दिवसांआधी विरोधी नेत्यांना सोहळ्यासाठी निमंत्रण दिलं नव्हतं. त्यानंतर त्यांना निमंत्रण दिलं आहे. मात्र विरोधी नेत्यांनी जाण्यास मज्जाव केला आहे. अशातच यावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपवर टीका केली आहे. पॉलिटीकल स्टंट करण्यामध्ये भाजपचा हात कोणी धरू शकणार नाही. तर दुसरीकडे राहुल गांधींना आसामच्या मंदिरामध्ये प्रवेश केला जाऊ दिला जात नसल्याचं राऊत म्हणाले आहेत. ते मुंबईत असताना बोलत होते.

काय म्हणाले संजय राऊत?

रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा असून दुसरीकडे राहुल गांधींना आसामच्या मंदिरामध्ये प्रवेश देण्यात आला नाही. यावर आता खासदार संजय राऊत यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. राऊत म्हणाले की, आज आयोध्येमध्ये रामाची प्राणप्रतिष्ठा करण्यात येणार आहे. मात्र हा केवळ भाजपने केलेला राजकीय स्टंट आहे. भाजपचा राजकीय स्टंट करण्यामध्ये कोणीही हात धरू शकत नाही. तर राहुल गांधींना आसाममध्ये मंदिरामध्ये प्रवेश करण्यासाठी विरोध केला आहे. भाजपच्या काही गुंडांनी राहुल गांधीवर हल्ला चढवला आहे. असं संजय राऊत म्हणाले आहेत.

हे ही वाचा

‘मी कोणता गुन्हा केला? मला मंदिरात जाऊ देत नाहीत’

कतरीना, प्रियंका आणि रश्मिका मंदानानंतर आता नोरा फतेही झाली डीपफेकची शिकार

‘पंतप्रधान नरेंद्र मोदी देशद्रोही’

त्यानंतर त्यांनी अधिवेशनाबाबत सांगितलं आहे. ‘नाशिकमध्ये अधिवेशन घेणार आहोत. देशात सध्या जे वातावरण आहे ते वातावरण बदलण्याचं काम करणार आहे. आयोध्येचा राजा राम आहे. मात्र संघर्ष लढाईसाठी येथे ओळख आहे. यामुळे आम्ही पंचवटीपासून सुरूवात करणार असून काळाराम मंदिराचे दर्शन घेणार आहोत.’ असं संजय राऊत म्हणाले आहेत.

‘रामाचा उत्सव हा राजकीय इव्हेंट’

‘रामाचा उत्सव हा धार्मिक आणि राष्ट्रीय उत्सव असायला हवा होता. या उत्सवासाठी शंकराचार्यांनी देखील विरोध केला आहे. आयोध्येतील राम मंदिराचा सोहळा हा खासगी सोहळा करण्यात आला असून राजकीय इव्हेंट करण्यात भाजपचा कोणीही हात धरू शकणार नाही’, असं संजय राऊत म्हणाले आहेत.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी