31 C
Mumbai
Monday, May 20, 2024
Homeराजकीय'मी कोणता गुन्हा केला? मला मंदिरात जाऊ देत नाहीत'

‘मी कोणता गुन्हा केला? मला मंदिरात जाऊ देत नाहीत’

२२ जानेवारीला जिकडं तिकडं रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेच्या चर्चा आहेत. अनेक माध्यमांनी आजच्या दिवशी मंदिराचे तसेच रामलल्लाच्या मूर्तीचे दर्शन घडवलं आहे. अशातच आता माध्यमांनी आजच्या दिवशीच्या एककल्ली बाजूचे दर्शन दाखवलं आहे. अशातच दुसरी बाजू म्हणजे कॉंग्रेस नेते राहुल गांधी (Rahul gandhi) यांना आसाममध्ये (Assam) संत शंकरदेव यांच्या मंदिरामध्ये (ठाणात) जाण्यपासून विरोध केला आहे. यावेळी पोलिस यंत्रणा आणि फौजफाट्यानंच चक्क राहुल गांधी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना रोखलं आहे. भारत जोडो न्याय यात्रेचा नववा दिवस असून याच दिवशी त्यांना मंदिरात जाण्यापासून मज्जाव केला असल्याने यावर राहुल गांधी यांनी मी कोणता गुन्हा केला? मला मंदिरात जाऊन देत नाही, मंदिरात कोणी जायचं हे पंतप्रधान ठरवणार का? असं म्हणत राहुल गांधी यांनी मोदींना धारेवर धरलं आहे.

एका बाजूला आयोध्येमध्ये श्रीरामाच्या प्राणप्रतिष्ठेनं आजच्या दिवशी सर्वांचं लक्ष वेधलं आहे. तर दुसऱ्या बाजूला राहुल गांधी यांना आसाम येथील संत शंकरदेव मंदिरात जाण्यापासून विरोध केला आहे. यावेळी पोलिस बंदोबस्त तैनात केला. यामुळे आता राहुल गांधींनी संताप व्यक्त केला आहे. ‘माझा गुन्हा काय आहे? आता मंदिरात कोणी जायचं हे सुद्धा पंतप्रधान ठरवणार का?’ पंतप्रधानांचं नाव न घेता मोदींवर टीका केली आहे. तसेच त्यांना दुपारी ३ नंतर मंदिरामध्ये जाण्यासाठी प्रवेश देण्यात येणार आहे. पोलिस प्रशासनांनी राहुल गांधींना दुपारी ३ नंतर मंदिरामध्ये जाण्यास परवानगी दिली आहे.

हे ही वाचा

गांधी – नेहरू यांच्यामुळे देशाचे भलेच झाले – उत्तरार्ध (शरद पवार यांचा विशेष लेख)

‘पंतप्रधान नरेंद्र मोदी देशद्रोही’

‘आता मरोस्तोवर हटत नाही…’

‘राघुपती राघव राजाराम’

यावेळी राहुल गांधी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी मोदी सरकारवर हल्ला चढवला आहे. सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. यामध्ये राहुल गांधी हे कार्यकर्त्यांमध्ये बसले आहेत. तर त्यांच्या बाजूला सर्व कार्यकर्त्यांनी गराडा घातला. यावेळी निषेध करत ‘रघुपती राघव राजाराम’ हे गीत गाताना कार्यकर्ते दिसत आहेत आणि या व्हिडीओची सर्वत्र चर्चा आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी