24 C
Mumbai
Monday, December 9, 2024
Homeमनोरंजन'इंडिया इज इंदीरा अॅंड इंदीरा इज इंडिया', 'इमर्जन्सी' चित्रपटाचा कंगना रान्नौतनं व्हिडीओ...

‘इंडिया इज इंदीरा अॅंड इंदीरा इज इंडिया’, ‘इमर्जन्सी’ चित्रपटाचा कंगना रान्नौतनं व्हिडीओ केला शेअर

बॉलिवूडमध्ये सध्या सर्वोत्तम चित्रपट आपल्या भेटीला येत आहेत. अशातच आता आणखी एका चित्रपटाची चर्चा गेली काही महिन्यांपासून होती, आता त्याच चित्रपटाची प्रतिक्षा संपुष्टात येणार आहे. अर्थातच आपण सध्या ‘इमर्जन्सी’ (Emergency) या चित्रपटाबाबत बोलत आहोत. अनेक महिन्यांपासून या चित्रपटाची चर्चा पाहायला मिळत आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे अभिनेत्री कंगना रान्नौतनं (kangana ranaut) या चित्रपटात इंदिरा गांधी (Indira Gandhi) यांची मुख्य भूमिका साकारली आहे. इंदिरा गांधींच्या काळामध्ये देशामध्ये आणीबाणी होती, त्यावेळीची परिस्थिती आणि तो काळ या चित्रपटामध्ये दाखण्यात आला आहे. आता याचा व्हिडीओ स्वत: कंगना रान्नौतनं सोशल मीडियावर प्रसारीत केला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Kangana Ranaut (@kanganaranaut)


अनेक दिवसांपासून इमर्जन्सी या चित्रपटाची चर्चा आहे. आता तो चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा चित्रपट देशवासीयांसाठी आणीबीणीकाळात न माहिती असलेल्या घटना उलघडणारा असल्याचं बोललं जात आहे. आता कंगनानं तो व्हिडीओ आपल्या सोशल मीडियावर शेअर केला आहे. व्हिडीओमध्ये आणीबाणीकाळात एका वर्तमानपत्रावर आणीबाणी घोषित केली होती. काळ २५ जून १९७५ मधील काळ चित्रपटामधील आहे. यावेळी जयप्रकाश नारायण यांची भूमिका प्रसिद्ध अभिनेते अनुपम खेर यांनी साकारली आहे. तर या व्हिडीओच्या शेवटी कंगनाचा डायलॉग आहे. मुझे इस देश की सेवा करने के लिए कोई नही रोक सकता, ‘इंडिया इज इंदीरा अॅंड इंदीरा इज इंडिया’, असा कंगनाचा संवाद आहे. या संवादाने इमर्जन्सी चित्रपटाची अधिकाधिक चर्चा होऊ लागली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Kangana Ranaut (@kanganaranaut)

हे ही वाचा

‘ढाल बनून बापमाणसं उभी राहतात’

मालदीवला लक्षद्वीप पडलं भारी, तब्बल ४०० कोटींचा घोटाळा

मोगलमर्दिनी छत्रपती ताराराणीच्या मुख्य भूमिकेत सोनाली कुलकर्णी, ‘या’ दिवशी चित्रपट होणार प्रदर्शित

चित्रपटाची रिलीज डेट आली समोर

कंगनाच्या इमर्जन्सी चित्रपटाची रिलीज डेट आता समोर आली आहे. हा सिनेमा २०२४ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. १४ जून २०२४ मध्ये हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेनं पाट पाहत आहेत.

दिग्गज कलाकारांची स्टारकास्ट

या चित्रपटामध्ये श्रेयस तळपदे ,अशोक छाबरा, महिमा चौधरी, मिलिंद सोमण , विशाक नायर  आणि दिवंगत अभिनेते सतीश कौशिक अशा दिग्गज कलाकारांची स्टारकास्ट पाहायला मिळणार आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी