32 C
Mumbai
Monday, January 29, 2024
Homeराजकीय'ढाल बनून बापमाणसं उभी राहतात'

‘ढाल बनून बापमाणसं उभी राहतात’

शरद पवार गटाचे नेते आणि आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांच्यावर ईडीने (ED) काही दिवसांआधी बारामती अॅग्रो या कंपनीवर धाड टाकली होती. अशातच मुंबईतील पाच कार्यालयावर ईडीनं तपास देखील केला आहे. त्यानंतर रोहित पवार यांच्यावर २४ जानेवारीला ईडी कारवाई करणार आहे. पुन्हा एकदा त्यांचा तपास करणार आहे. अशातच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (sharad Pawar) हे आता खुद्दा आपल्या नातवाच्या मागे ईडी कार्यालयामध्ये हजेरी लावणार आहेत. तर खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) या देखील याठिकाणी उपस्थित राहणार आहेत. अशातच आता रोहित पवार यांनी ईडी चौकशी होण्याआधी एक सोशल मीडियावर पोस्ट लिहिली आहे. सध्या ती पोस्ट व्हायरल होऊ लागली आहे.

काय म्हणाले रोहित पवार?

रोहित पवार यांच्यावर काही दिवसांआधी ईडीने धाड टाकली होती. तर अशातच आता रोहित पवार यांनी सध्या सुरू असलेल्या राजकारणावर भाष्य केलं आहे. ते म्हणाले की, ‘ज्यापद्धतीनं आधी सरकारनं ईडीचा वापर केला, मात्र तरीही यंत्रणांना सहकार्य केलं आहे. अशातच यंत्रणांवर दबाव आणला जात आहे. सध्या सुडाचं राजकारण पाहता दबाव आणून चुकीची कारवाई केल्यास घाबरून जाऊ नये, पवार साहेबांसोबत एकजुटीनं उभं राहावं. कोणापुढेही न झुकता महाराष्ट्र धर्म जपायचा आहे. माझ्या कुटुंबाला आणि कोवळ्या वयातील तरूणांना हे राजकारण समजण्यापलिकडचं आहे’, असं रोहित पवार यांनी आपलं मत मांडलं आहे.

हे ही वाचा

मालदीवला लक्षद्वीप पडलं भारी, तब्बल ४०० कोटींचा घोटाळा

मोगलमर्दिनी छत्रपती ताराराणीच्या मुख्य भूमिकेत सोनाली कुलकर्णी, ‘या’ दिवशी चित्रपट होणार प्रदर्शित

‘जय श्रीराम घोषणा देता कोणता पक्ष आणि नेते आचार विचारांचं पालन करतात?’

‘वय झालं म्हणून काय झालं?’

‘वय झालं म्हणून काय झालं?’ असा सवाल आता रोहित पवार यांनी केला आहे. अनेकदा उपमुख्यमंत्री अजित पवार हे वय झालं असं म्हणत असतात. यावर आता रोहित पवार यांनी ‘शरद पवार आणि सुप्रिया सुळे हे माझ्यासोबत येणार आहेत. त्यामुळे वय झालेली माणसं संधीही देतात आणि बापमाणसासारखी मागे ढाल बनून उभी राहतात. हे माझ्यासाठी खूप भारावणारं आहे. महाराष्ट्राचा सह्याद्री माझ्यामागे पाठिशी कणखरपणे उभा आहे.’ असं रोहित पवार म्हणाले आहेत.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी