32 C
Mumbai
Tuesday, May 14, 2024
Homeराजकीयमालदीवला लक्षद्वीप पडलं भारी, तब्बल ४०० कोटी तोट्यात

मालदीवला लक्षद्वीप पडलं भारी, तब्बल ४०० कोटी तोट्यात

देशाचं अस्तित्व हे सध्या जगामध्ये चांगल्या स्थितीत पाहायला मिळत आहे. जगभरातील अनेक पर्यटक मालदीवच्या (Maldive) वाटेवर सुखाचे क्षण मिळवण्यासाठी सुट्टीचा आनंद घेत होते. मात्र सध्याची परिस्थिती पाहता देशातील लक्षद्वीपने मालदीवची जागा घेतली आहे. यामुळे येत्या काळामध्ये देशात लक्षद्वीप (Lakshdweep) देशातील सर्वात महत्त्वाचं पर्यटन क्षेत्र होणार आहे. देशातील आणि जगातील अनेक पर्यटक मालदीवला जात होते मात्र मालदीवने पंतप्रधानांशी पंगा घेतल्याने पंतप्रधानांनी लक्षद्वीपची सफर केली आणि अनेक पर्यटकांनी लक्षद्वीपची वाट पकडली आहे. जवळजवळ ४०० कोटींचा तोटा मालदीवला झाला आहे. मोदींवर केलेलं अवमानकारक वक्तव्य मालदीवला भारी पडलं आहे.

सुमारे ४०० कोटींचे नुकसान

देशामध्ये अनेक दिवसांपासून लक्षद्वीपची चर्चा आहे. मालदीवने नरेंद्र मोदींचा केलेला अवमान आता मालदीवच्या अंगलट आला आहे. अशातच आता याचे परिणाम मालदीवला भोगावे लागले आहेत. मालदीवला देशातील अनेक पर्यटक आपली सुट्टी घालवण्यासाठी जातात. मात्र मालदीववर बहिष्कार टाकल्याने देशातील अनेक पर्यटक लक्षद्वीपला सुट्टीसाठी जात आहेत. अशातच यामुळे मालदीवचे ४०० कोटींचे नुकसान झालं आहे. मालदीव हे केवळ पर्यटनासाठी प्रसिद्ध आहे. मात्र मोदींशी घेतलेला पंगा त्यांना महागात पडला आहे. अशातच मालदीवमध्ये जवळजवळ ११८ हॉटेल्स आहेत. देशातील पर्यटक येणाऱ्या काळामध्ये मालदीवला न जाता लक्षद्वीपला येतील, असा अंदाज बांधण्यात येत आहे.

हे ही वाचा

मोगलमर्दिनी छत्रपती ताराराणीच्या मुख्य भूमिकेत सोनाली कुलकर्णी, ‘या’ दिवशी चित्रपट होणार प्रदर्शित

मीरा रोड परिसरात सनातनवाद्यांवर झालेल्या हल्ल्यावरून फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया

‘जय श्रीराम, जय श्रीराम’ नारा लावत कंगना राणाैत रामलल्लाच्या भक्तीत तल्लीन

अनेक भारतीय पर्यटक हे मालदीवला जात असल्याचं मालदीव पर्यटन मंत्रालयानं ही माहिती दिली आहे. त्याचा आकडा देखील आता समोर आला आहे. २,०९,१९८ एवढे भारतीय पर्यटक आहेत, तर रशियाचे २,०९,१४६ पर्यटक मालदीवला पर्यटनासाठी आले आहेत. १,८७,११८ पर्यटक चीनचे मालदीवला पर्यटनासाठी आले आहेत, अशा रिपोर्ट मालदीवच्या पर्यटन मंत्रालयानं दिला आहे.

भारत आणि मालदीवमध्ये तणाव

काही वर्षांपासून भारत आणि मालदीव यांच्यामध्ये मैत्रीपूर्ण संबंध होते. ऑक्टोबर २०२३ मध्ये मोहम्मद मोईज्जू मालदीवचे राष्ट्राध्यक्ष झाले त्यानंतर दोन्ही देशामध्य्ये तणावाची चिन्ह पाहायला मिळाली आहेत.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी