31 C
Mumbai
Monday, January 29, 2024
Homeमुंबईस्विगीच्या प्लॅटफॉर्म फीमध्ये वाढ होण्याची शक्यता

स्विगीच्या प्लॅटफॉर्म फीमध्ये वाढ होण्याची शक्यता

देशामध्ये सध्या ऑनलाईन पद्धतीनं अनेक सुविधा उपलब्ध होत आहेत. अशातच आता स्विगीवर प्लॅटफॉर्म फीमध्ये वाढ होणार असल्याची चर्चा आहे. लॉकडाऊनपासून स्विगीच्या वापरामध्ये अनेकांची वाढ झाली आहे. अनेक ग्राहक स्विगीच्या माध्यमातून काहीना काही वस्तू विकत घेतात. मात्र आता याचा परिणाम हा ग्राहकांच्या खिशावर होणार आहे, यामुळे आता स्विगीच्या प्लॅटफॉर्म फीमध्ये वाढ झाल्याने ग्राहकांच्या खिशाला कात्री बसणार आहे. स्विगीची प्लॅटफॉर्म फी ही सुरूवातील ५ रूपये होती. आता स्विगीची प्लॅटफॉर्म फी ही दुप्पट आकारण्यात येणार आहे. म्हणजेच ती फी आता १० रूपये होणार आहे.

स्विगीच्या प्लॅटफॉर्ममध्ये होणार वाढ

स्विगीच्या वाढीमध्ये गेले काही वर्षांपासून वाढ नव्हती मात्र सध्याचं स्विगी या कंपनीचे धोरण म्हणून प्लॅटफॉर्ममध्ये वाढ होणार असल्याची माहिती समोर आली. २०२३ मध्ये स्विगी या कंपनीच्या प्लॅटफॉर्मची फी ही केवळ २ रूपये होती. त्यानंतर त्यानंतर ती सध्या ५ रूपये आहे. तसेच ती येत्या काळामध्ये तीच फी ही १० रूपये होणार असल्याची महिती समोर येत आहे. कंपनीच्या धोरणामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचं ते म्हणाले आहेत.

हे ही वाचा

‘इंडिया इज इंदीरा अॅंड इंदीरा इज इंडिया’, ‘इमर्जन्सी’ चित्रपटाचा कंगना रान्नौतनं व्हिडीओ केला शेअर

‘ढाल बनून बापमाणसं उभी राहतात’

मालदीवला लक्षद्वीप पडलं भारी, तब्बल ४०० कोटी तोट्यात

स्विगी सध्या किराणा मार्टचं काम करत आहे. अनेक किराणा मालाच्या वस्तू स्विगी इंस्टामार्टवर विकल्या जात आहेत. कंपनी रकमेवर आपेक्षेपेक्षा जास्त फी आकारत नाही. फ्री डिलिव्हरी सुविधा ही आता स्विगीच्या माध्यमातून १९९ रूपयांच्या माध्यमातून उपलब्ध होते. सध्या तरी कंपनीनं फी वाढवली आणि येत्या काळामध्ये तसा अजून तरी निर्णय घेतलेला नाही. ग्राहकांना काय आवडते त्यांची निवड काय आहे. त्यांची नावड काय आहे. हे सर्व समजून घेण्यासाठी तसेच महिती जाणून घेण्यासाठी कंपनीला प्रयोग करावा लागत असल्याची माहिती स्विगीच्या प्रवक्त्यांनी दिली आहे.

मार्केटचा परिणाम स्विगीवर होतोय

सध्याच्या मार्केटचा परिणाम स्विगीवर झाला आहे. त्यामुळे चांगलाच फटका स्विगीवर पडताना दिसतो. तसेच अनेकदा मार्केट तेजीत असेल तर स्विगी या कंपनीला नफा होतो. याचा परिणाम कंपणीवर सकारात्मक पद्धतीनं होतो.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी