34 C
Mumbai
Saturday, May 18, 2024
Homeमनोरंजनमोगलमर्दिनी छत्रपती ताराराणीच्या मुख्य भूमिकेत सोनाली कुलकर्णी, 'या' दिवशी चित्रपट होणार प्रदर्शित

मोगलमर्दिनी छत्रपती ताराराणीच्या मुख्य भूमिकेत सोनाली कुलकर्णी, ‘या’ दिवशी चित्रपट होणार प्रदर्शित

सध्या मराठी चित्रपटाचा डंका हा सातासमुद्रापलिकडे पोहोचला आहे. मराठा चित्रपटांना सध्या अनन्य साधारण महत्त्व येऊ लागलं आहे. अशातच सध्या सर्वाधिक ऐतिहासिक चित्रपट म्हटलं की प्रेक्षक चित्रपट पाहण्यासाठी आतुर असतात. चित्रपट पाहण्यासाठी ते गर्दी करताना दिसत आहेत. काही वर्षांपासून जर मराठी चित्रपटांच्या विषयांचा अभ्यास केल्यास बॉलिवूडप्रमाणे मराठी चित्रपटांमध्ये देखील ऐतिहासिकपट बनवले जात आहेत. अशातच आता मोगलमर्दिनी छत्रपती ताराराणी यांच्या पराक्रमावर मराठी चित्रपट काही दिवसातच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचा काही दिवसांआधी पोस्टर लॉंच झाला. या पोस्टरवर अभिनेत्री सोनाली कुलकर्णा दिसत आहे.

पोस्टरमध्ये काय आहे?

ताराराणीच्या भूमिकेमध्ये सोनाली कुलकर्णी आहे. पोस्टर पाहिल्यावर लक्षात येतं की यामध्ये सोनालीच्या डोळ्यातील अंगार आणि हातात असलेली तलवार यामुळे चित्रपटाची अधिकाधिक उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. या पोस्टरची सर्वत्र चर्चा आहे. सोनाली कुलकर्णीनं आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर पोस्टर शेअर केलं आहे. ‘दिल्ली झाली दीनवाणी, दिल्लीशाचे गेले पाणी, ताराबाई रामराणी, भद्रकाली कोपली! मुघलहो सांभाळा!! छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापलेल्या हिंदवी स्वराज्याच्या इतिहासातील एक सोनेरी पान. आपल्या तलवारीच्या पातीवर दिल्लीच्या पातशहालाही नमवणारी ‘मोगलमर्दिनी छत्रपती ताराराणी’, असं कॅप्शन सोनालीनं पोस्ट शेअर करत दिलं आहे.

हे ही वाचा

मीरा रोड परिसरात सनातनवाद्यांवर झालेल्या हल्ल्यावर फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया

‘मी कोणता गुन्हा केला? मला मंदिरात जाऊ देत नाहीत’

‘आयोध्येत राजकीय स्टंट करण्यात भाजपचा हात धरू शकत नाही’

कधी होणार प्रदर्शित?

ताराराणी यांची भूमिका सोनाली कुलकर्णी करणार असून त्यांच्यासह कलाकार म्हणून अभिनेता आशय कुलकर्णी आणि अभिनेत्री सुरभी हांडे दिसणार आहेत. तर हा चित्रपट हा लवकरच म्हणजे २२ मार्च दिवशी महाराष्ट्रामध्ये सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. तर या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा ही राहुल जाधव यांनी सांभाळली आहे. सोनालीनं या चित्रपटाआधी हिरकणी या चित्रपटामध्ये हिरकणीची भूमिका केली होती. त्यामधील प्रत्येक दृश्य अंगावर काटे आणणारे होते.

सोनालीचे ‘हे’ चित्रपट अधिक चर्चेत

सोनालीचा पहिला सिनेमा बकुळा नामदेव घोटाळे असून तिला नटरंग या सिनेमातून सर्विधिक प्रसिध्दी मिळाली आहे. तसेच हिरकणी, मितवा, पांडू, पोस्टर गर्ल, तमाशा असे इतरही काही चित्रपट चर्चेत आहेत. मलाइकोट्टई वालीबान या मल्याळम सिनेमामध्ये देखील दिसणार आहे.

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी