33 C
Mumbai
Monday, May 20, 2024
Homeमनोरंजनअखेर कार्तिकला मुलगी सापडली !

अखेर कार्तिकला मुलगी सापडली !

‘सत्यप्रेम की कथा’ चित्रपटाच्या घवघवीत यशानंतर कार्तिक आर्यन आपल्या पुढच्या चित्रपटांसाठी सज्ज झाला आहे. कार्तिक सध्या चंदू चॅम्पियन चित्रपटाच्या शूटिंगमध्ये बिझी आहे. कार्तिकने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर ‘आशिकी3’ चित्रपटाची घोषणा करून बराच काळ लोटला. ‘आशिकी3’ चित्रपटाच्या निर्मात्यांना कार्तिक आर्यनच्या रूपात हिरो मिळाला खरा मात्र हीरोइन काही सापडत नव्हती.

सूत्रांच्या माहितीनुसार, ‘आशिकी3’ मध्ये कार्तिक आर्यनसह नवोदित अभिनेत्री आकांक्षा शर्मा दिसणार आहे. याबाबतीत अधिकृत घोषणा झाली नसली तरीही सध्या ‘आशिकी3’ चे निर्माता आणि आकांक्षा शर्मा यांच्यात अनेक बैठका सुरू आहेत. चित्रपटातील अभिनेत्रीबाबत अधिकृत माहिती कालांतरानेच दिली जाईल, असे सूत्रांकडून सांगण्यात आलं.

राहुल रॉय आणि अनु अग्रवाल अभिनीत ‘आशिकी’ हा मूळ चित्रपट 1990 मध्ये प्रदर्शित झाला. चित्रपटाला तरुणांनी अक्षरशः डोक्यावर घेतलं. चित्रपटातील गाणीही लोकप्रिय ठरली. आजही लोकांना ‘आशिकी’ चित्रपटातील गाणी आठवतात. चित्रपटाला मिळालेल्या उदंड प्रतिसादामुळे 2013ला ‘आशिकी 2’ प्रदर्शित करण्यात आला. अभिनेता आदित्य रॉय कपूर, अभिनेत्री श्रद्धा कपूर यांना खऱ्या अर्थाने ‘आशिकी 2’ मुळे इंडस्ट्रीत ओळख मिळाली. चित्रपट फारसा चालला नसला तरीही ‘आशिकी 2’ च्या गाण्यांनी अक्षरश धुमाकूळ घातला.
हे सुद्धा वाचा 
गोविंदा आला रे आला…. आकर्षक रंगातली मडकी बाजारात दाखल
जालना लाठीचार्ज प्रकरणी फडणवीसांनी मागितली मराठ्यांची माफी!
तामिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांच्या मुलाचा शिरच्छेद करणारास 10 कोटींचे बक्षिस; संत परमहंस आचार्यांची घोषणा

तब्बल दहा वर्षानंतर निर्मात्यांनी ‘आशिकी3’ची घोषणा केलीये. या चित्रपटाचे दिग्दर्शन अनुराग बासू करणार आहेत.आकांक्षा शर्मा कन्नड भाषेतील चित्रपटांमधील भूमिकांसाठी प्रसिद्ध आहे. ती टायगर श्रॉफसोबत डिस्को 82 मध्येही दिसली होती.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी