25 C
Mumbai
Friday, December 1, 2023
घरमनोरंजनअभिनेता मायकेल गॅम्बन यांचे निधन; हॉलिवुडमध्ये पाच दशकांची कारकीर्द

अभिनेता मायकेल गॅम्बन यांचे निधन; हॉलिवुडमध्ये पाच दशकांची कारकीर्द

‘हॅरी पॉटर’ चित्रपटातून प्रसिद्धीस पावलेल्या अभिनेता मायकेल गॅम्बनचे न्यूमोनिया या आजारामुळे निधन झाले. ते ८२ वर्षांचे होते. २००४ साली हॅरी पॉटर चित्रपटांमध्ये रिचर्ड हॅरिसऐवजी मायकेल गॅम्बन यांनी अल्बस डंबलडोरचे पात्र निभावले.

मायकेल गॅम्बन यांच्या कुटुंबियांनी जारी केलेल्या निवेदनातून त्यांच्या निधनाविषयी माहिती कळवण्यात आली. ” अतिशय जड अंतकरणाने आम्ही मायकेल गॅम्बन यांच्या निधनाविषयी माहिती देत आहोत. वयाच्या ८२ व्या वर्षी न्यूमोनिया आजारावर उपचार सुरु असताना त्यांचा मृत्यू झाला. रुग्णालयात उपचार सुरु असतानाच पत्नी आणि मुलासमोरच त्यांनी प्राण सोडले, अशी माहिती कुटुंबीयांनी दिली. मायकेल गॅम्बन यांच्या प्रवकत्याने कुटुंबीयांचे निवेदन प्रसारमाध्यमात जाहीर केले.

मायकेल गॅम्बन यांनी हॉलिवूडमध्ये पाच दशकांहून अधिक काळ योगदान दिले. त्यांच्या भारदस्त आवाजामुळे अनेक भूमिका लक्षात राहिल्या. २००२ साली हॅरी पॉटर चित्रपटातील रिचर्ड हॅरिसच्या मृत्युनंतर मायकेल गॅम्बन यांना अल्बस डंबलडोरचे पात्र मिळाले होते.

हे सुद्धा वाचा 
…तर गालावर वळ उठतील, राज ठाकरेंचा इशारा, जव्हारमध्येही परप्रांतीयाची मुजोरी
जयंत पाटलांनी वाजविली स्वत:चीच टिमकी, अजित पवार गटाने घेतले सगळ्यांना सामावून !
खुशखबर! तृतीय पंथीयांना मिळणार हक्काची घरे; रामदास आठवले पाठपुरावा करणार

आयरिश पंतप्रधान लिओ वराडकर यांनीही मायकेल गॅम्बन यांना श्रद्धांजली वाहिली. “मायकेल गॅम्बन एक उत्कृष्ट अभिनेता होते . बेकेट असो, डेनिस पॉटर असो किंवा हॅरी पॉटर असो, त्यांनी प्रत्येक भूमिकेसाठी आपले सर्वस्व दिले.” या पंतप्रधान लिओ वराडकर यांनी आपले दुःख व्यक्त केले.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी