28 C
Mumbai
Saturday, July 27, 2024
Homeमहाराष्ट्र'माझी लेकरं सरकारच्या स्वाधीन करत आहे'; धनगर आरक्षणासाठी आत्महत्या केलेल्या तरूणाची सुसाईड...

‘माझी लेकरं सरकारच्या स्वाधीन करत आहे’; धनगर आरक्षणासाठी आत्महत्या केलेल्या तरूणाची सुसाईड नोट आली समोर

राज्यामध्ये मराठा आणि धनगर आरक्षणावरून (Dhangar reservation) अधिकच वाद पेटू लागला आहे. मराठा समाजाप्रमाणेच आता धनगर समाजातील काही आंदोलक आत्महत्या करताना दिसत आहेत. काही दिवसांआधी सांगलीतील एका धनगर आंदोलकाने धनगर समाजाला आरक्षण मिळत नसल्याने शेतातील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. अशातच आता आणखी एका धनगर समाजातील तरूणानं आत्महत्या केल्याची माहिती समोर येत आहे. लातूर येथील रेल्वे रूळासमोर जात आत्महत्या केली. यावेळी मृतदेहाजवळ एक सुसाईड नोट सापडली आहे. ज्यात त्याने आत्महत्येचं कारण लिहिलं आहे.

आत्महत्या केलेल्या तरूणाचं नाव हे रमेश चंद्रकांत फुले आहे. त्याचं वय हे ३६ वर्षे असून तरूणाने रेल्वेसमोर उभं राहत आत्महत्या केली आहे. लातूर येथील आष्टी या गावातील घटना असून या घटनेनं संपूर्ण गावामध्ये शोक व्यक्त केला जात आहे. रमेश हा दुसऱ्याच्या शेतामध्ये मजुरी करायला जात होता. सत्तेत आल्यानंतरही धनगर समाजाला आरक्षण न दिल्याचं आणि धनगर समाजाकडे सरकार दुर्लक्ष करत असल्याचं रमेश नेहमी म्हणत असायचा. धनगरांना एसटी आरक्षण मिळताच तरूणांना सरकारी नोकऱ्या मिळतील, असं रमेश फुले म्हणाले आहेत. अजूनही धनगर समाजाला आरक्षण दिलं नसल्याने रमेश यांनी नैराश्यात येऊन आत्महत्या केली आहे.

काय लिहिलं सुसाईड नोटमध्ये

‘मी एसटी आरक्षणासाठी झटलो आहे. तरीही सरकारने आरक्षण दिलं नाही. मी खचून गेलो आहे मात्र आरक्षण दिलं नाही. मी आत्महत्या करत आहे. माझी लेकरं सरकारच्या स्वाधीन करत आहे’, अशी सुसाईडनोट त्यांनी लिहिली आहे.

हे ही वाचा

अमोल कोल्हेंना लख लाभ, मी काल सांगितलेलं माझं फायनल; अजित पवारांचा हल्ला बोल

हार्दिक पांड्याला १५ कोटींऐवजी मिळाले तब्बल ‘एवढे’ कोटी?

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी सामन्याआधी रोहित शर्माचं ‘या’ खेळाडूंबाबत भाकीत

या घटनेची माहिती पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आहे. रमेशचा मृतदेह नाळेगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात शव विच्छेदनासाठी पाठवला. जोपर्यंत नोकरीची लेखी आश्वासनं मिळत नाहीत, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही. अशी भूमिका मयत रमेश फुले यांच्या नातेवाईकांनी दिली घेतली.

सकाळी रमेश कामासाठी घराबाहेर पडला. रात्र झाली तरीही तो घरी आला नाही, असा घरच्यांना प्रश्न पडला. यावेळी रमेशने आत्महत्या केल्याचा निरोप कोणी तरी सांगितला. रमेशचे शिक्षण हे १२ वीपर्यंत असून त्याच्या पश्चात एक मुलगी, एक मुलगा, आई-वडिल, भाऊ-भावजय आणि पुतणे असा परिवार आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी